Breaking

शुक्रवार, १५ डिसेंबर, २०२३

रांगोळी स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी सादर केला उत्तम कलाकृतीचा आविष्कार : प्रा. आप्पासाहेब भगाटे


ठिपक्यांची रांगोळीची पाहाणी करताना प्रा. आप्पासाहेब भगाटे, प्राचार्य डॉ.सुरत मांजरे व डॉ.सौ. व्ही. व्ही. चौगुले व अन्य मान्यवर


 *जयसिंगपूर कॉलेजमध्ये ठिपक्यांची रांगोळी स्पर्धेचे यशस्वी आयोजन*


*डॉ. महावीर बुरसे : उपसंपादक*


जयसिंगपूर : जयसिंगपूर कॉलेजमध्ये सांस्कृतिक विभागाच्या वतीने  ठिपक्यांच्या रांगोळी या स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यात आले. यावेळी प्रमुख उद्घाटक म्हणून स्थानिक व्यवस्थापन समितीचे सदस्य मा.प्रा.आप्पासाहेब भगाटे होते. अध्यक्षस्थानी कॉलेजचे प्राचार्य डॉ. सुरत मांजरे,सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ.सौ. विजयमाला चौगुले व अन्य मान्यवर उपस्थित होते.

      याप्रसंगी डॉ.सौ.चौगुले यांनी मान्यवरांचे स्वागत करून कार्यक्रम आयोजनाचा हेतू स्पष्ट केला.

     मा.प्रा.आप्पासाहेब भगाटे मनोगत व्यक्त करताना म्हणाले, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी ठिपक्यांच्या रांगोळीच्या माध्यमातून उत्तम कलाकृतीचा आविष्कार सादर केला आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सुप्त कला गुणांना वाव मिळवून दिला आहे.तसेच पुढील कार्यासाठी प्रोत्साहित केले जात आहे हे कौतुकास्पद आहे.

      शैक्षणिक वर्ष 2023 च्या वार्षिक  सांस्कृतिक स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर रांगोळी स्पर्धेचं आयोजन करण्यात आले. सदर स्पर्धेत ज्युनियर विभागातील १४ व सीनियर विभागातील ३० विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविला होता. या स्पर्धेचे परीक्षक म्हणून डॉ. महावीर बुरसे व प्रा. शितल पाटील यांनी काम पाहिले.

     सदर कार्यक्रम घेण्यासाठी प्राचार्य डॉ.सुरत मांजरे यांचा मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रमास उपप्राचार्य डॉ.सौ.एम. व्ही.काळे,प्रा.डॉ. नितीश सावंत, प्रा.डॉ. नंदकुमार कदम,प्रा. भरत आलदर उपस्थित होते.

   या कार्यक्रम आयोजनामध्ये सांस्कृतिक विभागातील सदस्य  प्रा.सौ.एस.जी.संसुध्दी, डॉ. संदीप तापकिरे, ज्युनियर विभागाचे प्रा.सौ. अंजना चौगुले-चावरे,प्रा. स्वाती बस्तवाडे व अन्य सदस्यांचे सहकार्य लाभले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा