![]() |
नेहरू उद्यानामध्ये स्वच्छता अभियान |
*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
जयसिंगपूर : जयसिंगपूर नगरपरिषद जयसिंगपूर व जयसिंगपूर कॉलेज राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने जयसिंगपुरातील नेहरू उद्यानामध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
माझी वसुंधरा अभियान ४.० अंतर्गत स्वच्छतेचा उपक्रम राबविण्यात आला. नेहरू उद्यानामधील प्लॅस्टिक व रिकाम्या बाटल्या संकलित करण्यात आल्या. त्याचबरोबर उद्यानामधील कचरा गोळा करून उद्यान स्वच्छ करण्यात आले.
नगरपरिषदेचे प्रशासक व मुख्याधिकारी सौ. टीना गवळी यांच्या आवाहनाप्रमाणे व सौ. श्वेता कुराडे यांचे नेतृत्वाखाली नगरपरिषदेच्या रचनात्मक उपक्रमास राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी कामाच्या माध्यमातून साथ दिली.
या उपक्रमास जयसिंगपूर कॉलेजचे प्राचार्य डॉ. सुरत मांजरे, उपप्राचार्य प्रा. भारत आलदर, पर्यवेक्षक डॉ. महावीर बुरसे यांचे विशेष सहकार्य लाभले.
कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रभाकर माने,डॉ. खंडेराव खळदकर,प्रा. प्रा.सौ. स्वाती बस्तवाडे व एन.एस.एस. प्रतिनिधी कु. समृद्धी येलाज,श्री. प्रथमेश कोळी, कु. ऋतुजा सावंत,ज्युनिअर व सिनियर विभागातील एन.एस एस. स्वयंसेवक विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी होते. त्याचबरोबर नगरपरिषदेचे सफाई कामगार यांचे विशेष सहकार्य लाभले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा