![]() |
मयत मल्लाप्पा बसप्पा नाईक |
*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
कोल्हापूर : टोप येथे रोड रोलर अंगावरून गेल्याने तरूण जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना आज सायंकाळी ५.०० वाजण्याच्या सुमारास टोप हायस्कूल परिसरात घडली.
पोलिसांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार मल्लाप्पा बसप्पा नाईक ( वय वर्ष ४० रा.पाडळी खुर्द ता. करवीर ) असे मयत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.टोप येथील हायस्कूल परिसरात आनंदा पोवार यांनी प्लाॅट पाडलेल्या रस्त्याच्या सपाटी करणाचे काम चालू होते.अचानक रोड रोलरचा गिअर अडकल्याने रोड रोलर बंद पडला म्हणून मयत मल्लाप्पा नाईक हे खाली उतरून रोड रोलरच्या इंजिनचे डोअर खोलून काय बिघाड झालाय हे पाहत असताना अचानक रोड रोलर पुन्हा सुरू होऊन पुढे जात असताना नाईक यांनी रोलर थांबविण्याचा प्रयत्न केला मात्र रोलर त्याच्या अंगावरून गेल्याने नाईक हे जागीच ठार झाले. या अपघाताची नोंद शिरोली पोलिसात रात्री उशिरा झाली आहे.
सदर दुर्दैवी घटना घडल्याने परिसरात नागरिकाकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा