Breaking

मंगळवार, ५ डिसेंबर, २०२३

*शिवाजी विद्यापीठाच्या दूरशिक्षण केंद्राच्या वतीने सेट नेट कार्यशाळेचे आयोजन : संचालक प्रा.डॉ.डी.के.मोरे यांची माहिती*


दूरशिक्षण केंद्र,शिवाजी विद्यापीठ,कोल्हापूर


*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


 कोल्हापूर :  शिवाजी विद्यापीठातील दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राच्या वतीने सेट नेट कार्यशाळेचे आयोजन दि. ५ डिसेंबर ते ९ डिसेंबर,२०२३ या कालावधीमध्ये करण्यात आले असल्याची माहिती संचालक प्रा.डॉ.डी.के.मोरे यांनी दिली आहे.

          विद्यापीठ अनुदान आयोगाच्या वतीने घेण्यात येणारी नेट ही परीक्षा डिसेंबर महिन्यात आयोजित केली आहे. त्या अनुषंगाने दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्रातील एम ए (मराठी, हिंदी, इंग्रजी, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, समाजशास्त्र व इतिहास) एम. कॉम. एम.बी.ए.  या विषयातील विद्यार्थ्यांना या कार्यशाळेचा लाभ घेता येणार आहे.ही कार्यशाळा सकाळी ११.०० ते १.०० व दुपारी ३ ते ५ या वेळेत दोन सत्रांमध्ये विषयनिहाय संपन्न होणार आहे.

    या कार्यशाळे मध्ये डॉ.के.बी.पाटील ,डॉ.एम.बी.परीट,डॉ.दत्तात्रय मचले, श्री.डी.के.कमलाकर, श्री.व्ही.व्ही.पाटील, डॉ.प्रदीप जगताप, डॉ.कविता वडराळे,  डॉ.सरोज बिडकर,डॉ.राजेश पाटील व डॉ.अविनाश वर्धन मार्गदर्शन करणार आहेत. ही कार्यशाळा वेबिक्स माध्यमातून 

https://shivajiuniversity.webex.com/shivajiuniversity/j.php?MTID=m590a53f9a636732d0abd011b498bb525 या लिंक व youtube च्या माध्यमातून घेण्यात येणार आहे.                      तरी या कार्यशाळेसाठी संबंधित विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन संचालक प्रा.डॉ.डी.के.मोरे यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा