Breaking

शुक्रवार, १९ जानेवारी, २०२४

*युवारंग रांगोळी स्पर्धेत जे.जे. मगदुम इंजिनिअरिंगचा मुदस्सर मोमीन प्रथम स्थानी*


प्रथम क्रमांकाचा पुरस्कार स्वीकारताना मुदस्सर मोमीन व अन्य मान्यवर 


*भोलू शर्मा : जयसिंगपूर प्रतिनिधी*


  सांगली :  सांगलीतील वालचंद कॉलेज ऑफ इंजीनियरिंग तर्फे आर्ट सर्कल अंतर्गत आयोजित 'युवारंग ' उपक्रमातील रांगोळी स्पर्धेत मुदस्सर मोमीन ने प्रथम क्रमांक संपादन केला आहे. स्पर्धेत शिवाजी विद्यापीठ कक्षेतील विविध महाविद्यालयातील स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता.

   संयोजकांनी सुचवलेले  संस्कार भारती रांगोळी रेखाटन मुदस्सरने नियोजित वेळेत पूर्ण केले. तो डॉ. जे.जे.मगदूम कॉलेज ऑफ इंजीनियरिंग जयसिंगपूर चा विद्यार्थी आहे. प्रथम वर्ष कॉम्प्युटर  अभियांत्रिकी मध्ये तो सध्या शिकत आहे.

   या यशासाठी त्याला डॉ. जे.जे.मगदूम ट्रस्टचे चेअरमन डॉ. विजय मगदूम, व्हाईस चेअर पर्सन डॉ. सोनाली मगदूम  यांचे प्रोत्साहन व कॅम्पस डायरेक्टर डॉ. सुनील आडमुठे,प्राचार्या डॉक्टर शुभांगी पाटील, ॲडव्हायझर डॉ. उमेश देशन्नावर, विद्यार्थी कल्याण विभागाचे अधिष्ठता प्रा. पी. पी. पाटील, सांस्कृतिक विभागप्रमुख श्री.डी. आर. माने  यांचे मार्गदर्शन मिळाले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा