Breaking

शुक्रवार, १९ जानेवारी, २०२४

*शिरोळ तालुक्यातील जैनापूर-निमशिरगाव- दानोळी परिसरात बिबट्याचा वावर?*


*शिरोळ तालुक्यातील जैनापूर-निमशिरगाव- दानोळी परिसरात बिबट्याचा वावर

*भोलू शर्मा : जयसिंगपूर प्रतिनिधी*


जयसिंगपूर  : कोल्हापूर-सांगली बायपास मार्गावरील जैनापूर व निमशिरगाव (ता. शिरोळ) परिसरात गुरुवारी (ता.१८) बिबट्याचे दर्शन झाल्याने घबराट निर्माण झाली आहे. याच दरम्यान निमशिरगाव येथे मेंढीच्या सहा पिल्ली हल्ल्यात ठार झाली. बिबट्याचे दर्शन आणि पिलांवरील हल्ल्यामुळे वन विभागाने सापळा लावला. रात्री उशिरापर्यंत पथक जैनापूर परिसरात पाहणी करीत होते.

    जैनापूर येथे बिबटा महामार्ग ओलांडताना प्रवाशांनी पाहिले. यानंतर गावात बिबट्या आल्याची माहिती वाऱ्यासारखे पसरली. ग्रामस्थांनी तातडीने याबाबतची कल्पना वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली. रात्री निमशिरगाव येथे शेळी मेंढीची पिल्ले अज्ञात प्राण्याने हल्ला करून ठार केल्याचा प्रकार घडला. हा प्रकार लक्षात घेता हा हल्ला बिबट्यानेच केल्याचा संशय वन विभागाच्या अधिकाऱ्यांना आहे. हा बिबट्या दानोळी डोंगरावरुन निमशिरगाव डोंगरापर्यत आला असावा असा अंदाज व्यक्त केला आहे. सध्या ऊस तोडीचा हंगाम जोमात सुरू आहे. याच काळात बिबट्याच्या दर्शनाने ऊस तोड मजूर आणि शेतकऱ्यांची भीतीने गाळण उडाली आहे. रात्री उशिरा शेतात न जाण्याचे आवाहन वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी केल्याने ऊस तोडीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

      सदर परिसरात लोकांच्या मध्ये भीती निर्माण झाली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा