Breaking

शनिवार, १७ फेब्रुवारी, २०२४

*अनेकान्तच्या विद्यार्थिनींची यशस्वी कामगिरी*



कु.महेक मुल्ला आणि कु.सानिका लाटवडे 


*भोलू शर्मा : जयसिंगपूर प्रतिनिधी*


जयसिंगपूर : अनेकान्त इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, जयसिंगपूर येथील कॉलेजच्या कॉमर्स विभागातील विद्यार्थिनी कु.महेक मुल्ला व कु.सानिका लाटवडे यांनी पहिल्याच प्रयत्नात उत्तम मार्कांनी ‘द इन्स्टिट्युट ऑफ चार्टड अकौंटस ऑफ इंडिया (2023)’ सी.ए. फाऊंडेशनची परीक्षा पार केली आहे.

अथक प्रयत्न, अभ्यास तसेच योग्य मार्गदर्शन व चिकाटी यामुळे हे यश शक्य झाले. यामध्ये संस्थेचे चेअरमन मा.डॉ.श्री.सुभाष अडदंडे, सचिव डॉ. महावीर अक्कोळे व सर्व कमिटी मेंबर्स, CEO श्री. अभिजीत अडदंडे, मुख्याध्यापिका सौ. प्रिया गारोळे मॅडम तसेच कॉलेजच्या शिक्षकांचे मार्गदर्शन मिळाले.

      सदर विद्यार्थीनींचे सर्व स्तरांतून  कौतुक होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा