Breaking

शनिवार, १७ फेब्रुवारी, २०२४

*जयसिंगपूर-उदगाव केंद्राच्या वतीने उद्या रक्तदान शिबिराचे आयोजन*

 



*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


जयसिंगपूर : जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थांनाच्या वतीने महा रक्तदान शिबिराचे आयोजन दिनांक १० फेब्रुवारी ते दिनांक २५ फेब्रुवारी २०२४ या दरम्यान संपूर्ण राज्यात होत आहे. याच पार्श्वभूमीवर जयसिंगपूर- उदगाव केंद्राच्या वतीने प्राथमिक आरोग्य केंद्र,जयसिंगपूर येथे रविवार दिनांक १८ फेब्रुवारी, २०२४ रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. 

    जगद्‌गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या प्रेरणेने स्व-स्वरुप संप्रदाय तर्फे दरवर्षी रक्तदान शिबिर आयोजित केले जात असते. या संस्थांच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजन करण्याचा हेतू हा उदात्त व मनुष्य कल्याणत्मक आहे. सध्या महाराष्ट्रात सिकलसेल अनेमिया, हिमोफिलीया, थंलॅसेमिआ, ब्लड कॅन्सर, किडनी फेल्युअर पेशंट जास्त आढळतात अशा रुग्णांना वारंवार रक्ताची नितांत आवश्यकता असते. यासाठी महाराष्ट्र शासनाच्या रक्तपेढ्यांना रक्तबाटल्या देण्याचे आमच्या संप्रदाया मार्फत निश्चित केले आहे.

   यासाठी आपल्या दैनंदिन जीवनातील फक्त ५ मिनिटे रक्तदानासाठी आवश्यक आहेत, तुमच्यासाठी ते आहे फक्त दान, मात्र गरजूंसाठी ते आहे जीवनदान ! स्वतः बरोबर आपल्या मित्र व नातेवाईकांस या महान रक्तदान कार्यासाठी प्रवृत्त करा.तरी आपल्या व्यस्त दिनचर्येतून आमच्यासाठी आपला बहुमोल वेळ काढून वरील ठिकाणी रक्तदान करण्यास येवून या सामाजिक कार्यात सहभागी व्हावे.तरी जयसिंगपूर शहर व पंचक्रोशीतील सर्व रक्तदात्यांना  रक्तदान करून राष्ट्रीय कार्यात सहभाग नोंदवावा असे आवाहन मुख्य आयोजक  श्री.दिलीप चव्हाण (तालुका सेवा अध्यक्ष),श्री गणपती मोरे व सामाजिक कार्यकर्ते श्री.सुरेश शिंगाडे  यांनी केले आहे.


रक्तदानाचे फायदे :

* रक्तदान केल्यावर शरीरातील रक्त तयार करणाऱ्या पेशींना प्रेरणा मिळून ४८ तासात नवीन शुद्ध रक्त पूर्णपणे भरुन निघते.

* रोग प्रतिकार शक्ती वाढते.

* नियमित ३-४ महिन्यांनी रक्तदान केल्यास रक्तदाब, कर्करोग, हृदयविकार, होण्याचे प्रमाण कमी होते.


अधिक माहितीसाठी संपर्क : 9421204456

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा