Breaking

मंगळवार, २० फेब्रुवारी, २०२४

*हुपरी पोलीस ठाण्याचा सहा. फौजदार लाचलुचपतच्या जाळ्यात


सहायक फौजदार अँटी करप्शन ब्युरो च्या ताब्यात


*प्रा.डॉ. प्रभाकर माने मुख्य संपादक*


कोल्हापूर :  तक्रारदार व त्यांच्या शेजारी राहत असलेल्या शेजारी यांचे कुत्रा चावले या कारणावरून तक्रारदार आणि त्यांचा मुलगा यांच्यावर एकमेकावर गुन्हा दाखल असून त्यामध्ये तक्रारदार आणि त्यांच्या मुलाला अटक न करण्यासाठी व गुन्ह्यामध्ये मदत करण्यासाठी दिलीप तिवडे, वय वर्ष ५२ (सहा फौजदार) नेमणूक हुपरी पोलीस ठाणे यांनी तक्रारदार यांच्याकडे 10 हजार रुपयाची लाचेची मागणी केली होती.

      तडजोडीअंती 9 हजार रुपये लाच स्वीकारताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले असून आरोपी यांचेविरुद्ध हुपरी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्याची कायदेशीर कारवाई सुरू आहे. ही कारवाई पर्यवेक्षण अधिकारी सरदार नाळे (पोलीस उपअधीक्षक), बापू साळुंके, पोलीस निरीक्षक श्रेणीपो उप नि बंबरगेकर, पोहेकॉ. घोसाळकर, पोना. सचिन पाटील, मपोकॉ/पुनम पाटील, चापोहेकॉ. विष्णु गुरव, चापोहेकॉ.सुरज अपराध, ला.प्र.वि.कोल्हापूर यांच्या पथकाने केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा