![]() |
बसवान खिंड येथे एकाचा अपघाती मृत्यू |
*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
जयसिंगपूर : कोल्हापूर-सांगली मार्गावरील बसवान खिंड येथे हॉटेल ट्रॅगल समोर मंगळवारी सकाळी आयशरने पादचाऱ्यास उडवल्याने पादचारी जागीच ठार झाला आहे.
महादेव गायकवाड वय वर्ष ३० रा.विकासनगर इचलकरंजी असे मृत व्यक्तीचे नाव आहे. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, कोल्हापूर येथुन सांगलीकडे जाणारा आयशरने मंगळवारी सकाळी बसवान खिंड येथील हॉटेल ट्रॅगल समोरून चालत जाणाऱ्या महादेव गायकवाड यांना मागून जोराची धडक दिली. यामध्ये गायकवाड हा जागीच ठार झाला. दरम्यान अपघातानंतर आयशर चालक पळून गेल्याने स्थानिक नागरिकांनी पाठलागकरून तमदलगे येथे पकडले, यावेळी चालक मधधुंद अवस्थेत असल्याचे कळले, घटनास्थळी समर्थ रुग्णवाहिका व हातकणंगले पोलीस दाखल झाले असून सदर घटनेच्या पंचनामाचे कामकाज सुरु होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा