Breaking

रविवार, १८ फेब्रुवारी, २०२४

शिवजयंती निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन व वयोवृद्ध नागरिकांनासाठी मोफत स्टिकचे वाटप*


कवडसा फाउंडेशन, जयसिंगपूर


*प्रा.डॉ.प्रभाकर माने : मुख्य संपादक*


जयसिंगपूर :  उद्या सोमवार दिनांक १९ फेब्रुवारी, २०२४ रोजी   जयसिंगपुरातील शाहू नगर येथे संत सेना महाराज हॉलमध्ये सकाळी ९.०० वाजता  वयोवृद्ध नागरिकांसाठी मोफत स्टिकचे वाटप व सकाळी ९.३० ते ४.०० वाजेपर्यंत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

      रुग्णांना आवश्यक असणारा रक्तपुरवठा अपुरा असून यामुळे रुग्णांचे जीव धोक्यात जात आहेत.यासाठी जयसिंगपूर शहरातील नागरिकांनी  लोकहिताचा विचार करून मोठ्या प्रमाणात रक्तदान करावे असे आवाहन  कवडसा फाउंडेशनचे संस्थापक व प्रसिद्ध धन्वंतरी डॉ. महावीर अक्कोळे व फाउंडेशनचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते श्री.बंडू उर्फ शुक्राचार्य उरणकर यांनी केले आहे. सर्वात वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट म्हणजे श्री.बंडू उरणकर यांनी ९९ वेळा रक्तदान करून रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान आहे हे त्यांच्या कृतीतून दाखविले आहे.

      कवडसा फाउंडेशनच्या माध्यमातून मानवतावादी सेवा हे वृत्त स्वीकारले असून आज तागायत गरीब व गरजू रुग्णांना सामाजिक भावनेने विविध प्रकारचे  रुग्ण साहित्य सेवा माफक दरात  पुरविले जात आहे. दरवर्षी रक्तदानाचे उपक्रम व इतर वैद्यकीय सेवा मोफत व माफक दरात पुरवल्या जात आहेत. कवडसा फाउंडेशनच्या वतीने गेल्या १० वर्षात महापूर व कोरोना महामारीच्या काळात निस्वार्थी भावनेने मानवतावादी सेवा पुरवली आहे. शहरातील विविध सामाजिक, शैक्षणिक, कला व सांस्कृतिक उपक्रमात सक्रियपणे सहभाग नोंदवून देश व समाजहितार्थ कार्य केले जात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा