Breaking

शुक्रवार, २३ फेब्रुवारी, २०२४

*पर्यावरण व स्वच्छता दूत म्हणून जयसिंगपूर कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थिनी कु.समृद्धी येलाज व कु.ऋतुजा सावंत यांचा सत्कार*


पर्यावरण व स्वच्छता दूत पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते स्वीकारताना


*भोलू शर्मा :  जयसिंगपूर प्रतिनिधी*


जयसिंगपूर : जयसिंगपूर नगरपरिषद आयोजित माझी वसुंधरा अभियान ४.० अंतर्गत (स्वच्छ सर्वेक्षण २०२४) पर्यावरणीय व स्वच्छता उपक्रमाच्या अनुषंगाने उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या जयसिंगपूर कॉलेज,जयसिंगपूर ची राष्ट्रीय सेवा योजनेची विद्यार्थिनी कु. समृद्धी अनिल येलाज (बी.सी.एस.भाग -२) आणि कु.ऋतुजा विजय सावंत (बी.एस्सी.भाग -२) या विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी  आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर, शिरोळ तालुका आरोग्य अधिकारी डॉ. पांडुरंग खटावकर, जयसिंगपूर नगरपरिषद मुख्याधिकारी श्रीमती टिना गवळी व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत हा सत्कार सोहळा संपन्न झाला.

       मुळात जयसिंगपूर नगर परिषदेच्या वतीने माझी वसुंधरा अभियान ४.० अंतर्गत जयसिंगपूर परिसरात मोठ्या प्रमाणात भूमी, जल,अग्नी, वायु व आकाश या पंचमहाभूते तत्त्वांचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून विविध माध्यमातून उपक्रम राबविण्यात येत आहे.याच पार्श्वभूमीवर जयसिंगपूर कॉलेजच्या या विद्यार्थिनींनी माझी वसुंधरा अभियानांतर्गत विद्यापीठ स्तरीय  विशेष श्रमसंस्कार शिबिरात सक्रीय सहभाग( फेब्रुवारी २०२२) ,विशेष श्रमसंस्कार शिबिर,मौजे धरणगुत्ती (ई बाईक रॅली, ई- pledge),कृष्णा नदी पात्रातील विसर्जित केलेल्या गणेशमूर्ती व निर्माल्य नदीपात्रा बाहेर काढणे ( जयसिंगपूर जॅकवेल नदी घाट परिसर),प्लास्टिक संकलन (जयसिंगपूर कॉलेज परिसर),वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन मौजे धरणगुत्ती, नेहरू उद्यान स्वच्छता, माझी वसुंधरा अभियानांतर्गत जनजागृती रॅली ( मौजे धरणगुत्ती व जयसिंगपूर),नवमतदार नोंदणी अंतर्गत जनजागृती रॅली,संविधान दिनानिमित्त रॅली,प्लास्टिक संकलन व स्वच्छता मोहीम अंतर्गत रामलिंग व अल्लमप्रभू डोंगर येथे विशेष कामगिरी, माझी वसुंधराअंतर्गत जनजागृती, ऑनलाइन सर्वेक्षण,शिवजयंती निमित्त आयोजित रक्तदान शिबिरामध्ये सहभाग, मेरी माटी मेरा देश या उपक्रमात सक्रिय सहभाग,कोथळीच्या मंगोबा देवालय परिसरातील प्लास्टिक संकलन व स्वच्छता अभियान,विविध सामाजिक उपक्रमात सक्रिय सहभाग,साप्ताहिक संविधानचा आवाज आयोजित संविधान दिन स्वच्छता अभियान,विविध सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग, भूमी,जल,अग्नी,वायू व आकाश या पंच महाभुते तत्त्वांसाठी कार्य, पंचगंगा नदीघाट स्वच्छता उपक्रमात सहभाग, धरणगुत्ती स्मशानभूमीत स्वच्छता, वसुंधरा अभियानासाठी जनजागृती रॅली अशा विविध पर्यावरणीय व सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून त्यांनी भरीव कामगिरी केली आहे.

    यासाठी संस्थेचे अध्यक्ष डॉ.सुभाष अडदंडे, सचिव डॉ. महावीर अक्कोळे,खजिनदार पद्माकर पाटील व संस्थेचे पदाधिकारी यांचे सहकार्य ,कॉलेजचे प्राचार्य डॉ. सुरत मांजरे, शिवाजी विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना कक्षाचे संचालक डॉ. तानाजी चौगले यांच्या मार्गदर्शनाखाली आणि NSS कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रभाकर माने व डॉ. खंडेराव खळदकर यांचे विशेष सहकार्य लाभले.

      या दोन्ही विद्यार्थिनींचे सर्वत्र कौतुक होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा