![]() |
उदगावमध्ये आचार्यश्री विद्यासागरजी महाराज यांना विनयांजली : बालब्रम्हचारी तात्या भैय्याजी विनायांजली सभेत बोलताना |
*प्रा.डॉ. प्रभाकर माने :.मुख्य संपादक*
जयसिंगपूर : आचार्यश्री १०८ विद्यासागरजी महामुनिराज यांचे विचार पुढे नेणे ही आपली जबाबदारी आहे. त्यांनी दाखवलेल्या मार्गावरून चालणे ही त्यांना आपली खरी विनयांजली ठरणार आहे. आपण महावीर भगवानांना पाहिले नाही, शांतीसागर महाराज यांना पाहिले नाही मात्र विद्यासागर महाराज यांच्या रूपाने ते आम्हाला दिसले, असे उद्गार आचार्यश्रींच्या अंतिम समयीच्या प्रत्यक्ष घटनांचे साक्षिदार असणारे बालब्रम्हचारी तात्या भैय्याजी यांनी काढले.
संतशिरोमणी आचार्यश्री १०८ विद्यासागरजी महामुनिराज यांचे डोंगरगड (छत्तीसगड) येथे अत्यंत उत्कृष्ट सल्लेखना पूर्वक समाधी मरण झाले.उदगाव, ता. शिरोळ येथील कल्पवृक्ष गार्डन येथे शांती, विद्या, ज्ञानसंवर्धन संस्थेच्यावतीने रविवारी विनयांजली सभा घेण्यात आली. यावेळी आचार्यश्रींच्या पवित्र स्मृतीस विनम्र विनयांजली वाहण्यात आली. यावेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, आचार्यश्री हे कोणतीही गोष्ट कोणालाही न सांगता करत असत. त्यांनी सल्लेखनाची प्रक्रिया ही खूप दिवसांपूर्वी सुरू केली होती. मात्र ही गोष्ट त्यांनी कधीही सांगितली नाही. त्यांचे त्याग, संयम हे अनमोल असे विचार आपल्याला नेहमी साथ देणार असल्याचे सांगितले.जिनधर्म प्रसारासोबतच राष्ट्र उभारणीमध्ये आचार्यश्री यांनी मोठे योगदान दिल्याचे मत राजू शेट्टी यांनी व्यक्त केले. हातकरघा , आयुर्वेद , मुलींच्या शिक्षणासाठी उभारलेले प्रतिभास्थली यासह शेतीसाठी जुने वान बीज निर्मितीसह अनेक पैलूंवर आचार्यश्री यांनी दिलेलं योगदान खूप मोठं असल्याचे मत त्यांनी मांडले.आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी जयसिंगपूर नगरीमध्ये प्रथमचार्य शांतीसागरजी महाराज व आचार्यश्री विद्यासागरजी महाराज यांचे स्मारक उभारण्याचा मनोदय व्यक्त करून विनायांजली वाहिली.आमदार प्रकाश आवाडे यांनी बाहुबली तीर्थ क्षेत्रावर आचार्यश्री यांचा किर्तीस्थम्ब तसेच व्रती आश्रम उभारण्याचा व इचलकरंजी मध्ये किर्तीस्थम्ब उभारण्याचा संकल्प करून वीणयांजली वाहिली.
प्रारंभी मंगलाचरणांने कार्यक्रमाची सुरुवात झाली. आचार्यश्रीजींच्या प्रतिमेचे अनावरण आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर , तात्या भैयाजी व उपस्थित मान्यवर यांच्या हस्ते झाले. तर हातकरघा केंद्राचे उदघाटन माजी खासदार राजू शेट्टी साहेब व सावकर मादनाईक यांच्या हस्ते करण्यात आले. उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी प्रणवी तिप्पानावर, आगम बारगाले, अक्षता बावणे, उदय शास्त्री, पुरंदर पाटील, जमीर मुजावर, प्रदिप सुरवशी , डॉ. मनोज पाटील, अमोल गाट, सुहास पाटील, महावीर कुडचे, रावसाहेब चौगुले, शांतीनाथ पाटील, प्रतीक्षा वडगावे, महावीर होरे यांनी विनयांजली वाहिली.
स्वागत व प्रास्ताविक डॉ. शीतल पाटील यांनी तर सूत्रसंचालन अभय भिलवडे यांनी केले. यावेळी माजी खासदार राजू शेट्टी, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, प्रकाश आवाडे, सावकर मादनाईक, स्वरूपाताई पाटील यड्रावकर , राहुल आवाडे , अभयकुमार बरगाले यांनी मनोगत व्यक्त केले.यावेळी शीतल गतारे, राजू झेले,दादा पाटील चिंचवाडकर, सागर मादनाईक, अमित पाटील ,बजरंग खामकर, प्रवीण इंगळे, राजगोंडा पाटील यांच्यासह महाराष्ट्र व कर्नाटक भागातील हजारो श्रावक-श्राविका उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा