![]() |
शिवप्रतिमेचे पूजन करताना पोलीस निरीक्षक सत्यवान हाक्के |
*भोलू शर्मा : जयसिंगपूर प्रतिनिधी*
जयसिंगपूर : शिवजयंती निमित्त अनेकांत एज्युकेशन सोसायटीचे जयसिंगपूर कॉलेज जयसिंगपूर मध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी कॉलेजच्या आजी-माजी विद्यार्थ्यांनी रक्तदान करून अनोख्या पद्धतीने सामाजिक भान जपणारी शिवजयंती साजरी करून छ. शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात आले.
कॉलेजचे आजी विद्यार्थी,राष्ट्रीय सेवा योजना व माजी विद्यार्थी संघटना यांच्या संयुक्तपणे हे शिबिर राबविण्यात आले. विद्यार्थ्यांनी या रक्तदान शिबिरास उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. विशेष म्हणजे मनसेचे कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष व कामगार सेनेचे राज्य कार्यकारणी सदस्य मा.भगवानदादा जांभळे यांनी रक्तदान करून रक्तदात्यांना प्रेरित केले.
शिवजयंती सोहळा निमित्त हलगी व अन्य पारंपारिक वाद्याच्या गजरात अत्यंत उत्साहपूर्ण व जल्लोषात छ. शिवरायांची पालखी कॉलेज प्रांगणात आली. कॉलेजचे प्राचार्य डॉ. सुरत मांजरे यांनी पालखीचे उत्साहात स्वागत केले. जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे नूतन पोलीस निरीक्षक सत्यवान हाक्के यांनी शिवप्रतिमेला हार घालून पूजन केले.
याप्रसंगी विद्यार्थी मावळ्यांनी इतिहासकालीन मर्दानी खेळाचे प्रात्यक्षिकाचे सादरीकरण करून उपस्थितांच्या मध्ये उत्साह निर्माण केला.
या कार्यक्रमासाठी मनसेचे कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष मा.भगवानदादा जांभळे,स्वाभिमानी विद्यार्थी परिषदचे अध्यक्ष सौरभ (दादा) शेट्टी, गटशिक्षणाधिकारी दीपक कामत, जयसिंगपूर नगरपरिषदेचे शिक्षणाधिकारी मेघन देसाई,माजी नगरसेवक शैलेश (दादा) चौगुले, सामाजिक कार्यकर्ते सागर (दादा) माने आदी उपस्थित होते.
सर्व प्राध्यापक व प्रशासकीय सेवक कर्मचारी व आजी-माजी विद्यार्थी - विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रम आयोजनामध्ये एन एस एस कार्यक्रम अधिकारी डॉ. खंडेराव खळदकर,अजय भाट, बिपिन यादव, अनुप दाइंगडे, पंकज पाटील व प्रथमेश जाखले यांचा सहभाग महत्त्वाचा होता.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा