*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
जयसिंगपूर : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून वर्षभरात २३ छापे टाकले असून, त्यातील तक्रारदारांची शासकीय कामे पूर्ण केली आहेत. त्यामुळे तक्रारदारांनी विनासंकोच लाच घेणाऱ्यांच्या विरोधात तक्रार द्यावी असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक सरदार नाळे यांनी आज पत्रकारांशी बोलताना दिली.
सरदार नाळे पुढे म्हणाले, कुठलाही सरकारी दाखला लाचे शिवाय मिळणे तुमचा हक्क आहे.'आरोग्य विभागात लाच घेणाऱ्या वरिष्ठ लिपिकाला कालच न्यायालयाकडून पाच वर्षे शिक्षा सुनावण्यात आली. त्यामुळे तक्रारदारांचा विश्वास वाढला आहे. २०२३ मध्ये एकूण २३ ठिकाणी छापे टाकले असून ४० जणांना संशयित आरोपी केले आहे. यामध्ये दोन महिला व ३३ पुरुष आहेत. तर खासगी आणि उमेदवार असलेले पाच संशयित आहेत.२३ छाप्यात पोलिस ४, आरोग्य २, ग्रामविकास २, नगरपरिषद १, जलसिंचन १, शिक्षण २,सहकार संस्था, महावितरण, महसूल,वनविभाग, विक्रीकर, पाणीपुरवठा,जिल्हा क्रीडा, महावितरण, भूमी अभिलेख, महानगरपालिका, कृषी विभागातील प्रत्येकी एका छाप्याचा समावेश आहे.
विशेष म्हणजे ज्यांनी तक्रार दिली आहे, त्यांना शासकीय काम पूर्ण होईल की नाही अशी शंका असते.त्यामुळे ते तक्रार देण्यासाठी घाबरतात.मात्र, त्या सर्वांची लाचेसाठी थांबविलेली सरकारी कामे पूर्ण केली आहेत. तसेच लाचेसाठी वापरलेली रक्कमही त्यांना महिन्यात परत केली आहे.
लाचलुचपत विभागाचा संपर्क क्रमांक : ०२३१- २५४०१८१ आणि टोल फ्री नंबर १०६४
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा