![]() |
मार्गदर्शन करताना मा. धीरज देशपांडे व अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्राचार्य डॉ.भास्कर ताम्हनकर, समन्वयक डॉ. मनोहर कोरे व अन्य मान्यवर |
*भोलू शर्मा : विशेष प्रतिनिधी*
सांगली : विलिंग्डन महाविद्यालय, सांगली येथे वै.वी.स.पागे विचारमंच आयोजित व्याख्यानात युवकांनी स्टार्टअप सुरू करून उद्योग व्यवसायाकडे वळावे असे प्रतिपादन सुप्रसिद्ध सनदी लेखापाल व ख्यातनाम वक्ते मा. धीरज देशपांडे यांनी केले .
"विकसित भारत आणि उद्योजकता" या विषयावर मार्गदर्शन करताना प्रमुख वक्ते मा.धीरज देशपांडे म्हणाले, कोणताही उद्योग सुरू करीत असताना आपल्या जमेच्या बाजू बरोबरच येणाऱ्या समस्या यांचा अभ्यास करावा.आपल्या व्यवसायातून तयार होणाऱ्या मालाला योग्य अशी बाजारपेठ आणि ग्राहक मिळतील याचा आढावा घ्यावा.तसेच व्यवसायासाठी लागणारा कच्चामाल मोठ्या प्रमाणात उपलब्ध असणाऱ्या भागात आपला उद्योग सुरू करावा. ते पुढे म्हणाले,स्टार्टअप सुरू करताना आजकाल युवकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो .कुटुंबाचे पाठबळ मिळत नाही ,भांडवलाची कमतरता असते, उद्योग करण्यात जोखीम असते ,असुरक्षिततेची भीती असते ,यासाठी त्यांनी मुद्रा योजना ,स्टार्टप आणि बँकांच्या कर्ज योजनांची माहिती दिली .उद्योगासाठी लागणाऱ्या कर्जात 80 टक्के कर्ज बँक देते आणि 20% आपल्याला भांडवल उभारावे लागते .जोखीम पत्करण्याबरोबरच ती हस्तांतर करता आली पाहिजे तर आपण उद्योगा मध्ये यशस्वी होऊ शकतो .पहिल्या तीन-चार वर्षात कर्जाची परतफेड केली तर राहिलेल्या काळात उद्योगातून चांगला नफा मिळू शकतो असेही ते म्हणाले .यातून युवकांनी जास्तीत जास्त व्यवसाय उद्योगाकडे वळावे नोकरी मागणारे न होता नोकरी देणारे व्हावे असे ते म्हणाले.
अध्यक्ष म्हणून बोलताना प्राचार्य डॉ.भास्कर ताम्हणकर यांनी विद्यार्थ्यांना असणाऱ्या संधी आणि त्यासाठी महाविद्यालय उपलब्ध करून देत असलेले अनेक क्षेत्रातील मान्यवरांची वेळोवेळी दिल्या जाणाऱ्या मार्गदर्शनाची माहिती दिली ,त्याचा विद्यार्थ्यांना निश्चित फायदा होईल आणि ते आपल्या जीवनात यशस्वी होतील असे प्रतिपादन केले. यावेळी परिषद सदस्य रवींद्र ब्रह्मनाळकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
प्रारंभी दीपप्रज्वलन व प्रतिमापूजन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक अर्थशास्त्र विभाग प्रमुख व विचार मंचाचे समन्वयक प्रा .डॉ.मनोहर कोरे यांनी केले .पाहुण्यांचा परिचय उपप्राचार्य व आजीव सदस्य डॉ. रवींद्र कुलकर्णी यांनी करून दिला.डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे प्रबंधक डॉ. सिद्धेश्वर जाधव यांनी आभार मानले .उत्तम सूत्रसंचालन प्रा.महादेव ठोंबरे यांनी केले.
या कार्यक्रमास विविध महाविद्यालयातील विद्यार्थी व प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा