Breaking

रविवार, १४ एप्रिल, २०२४

*जयसिंगपुरातील राजीव गांधीनगर येथे डॉ.आंबेडकर जयंती कार्यक्रम संपन्न*


जयसिंगपूरच्या राजीव गांधी नगर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती संपन्न


*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


जयसिंगपूर : जयसिंगपूर शहरातील राजीव गांधीनगर येथील आठव्या गल्लीत एडव्होकेट मा. शितल कांबळे यांच्या पुढाकाराने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. 

      याप्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला सर्व मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार व फुले अर्पण करून त्यांच्या विचारांना व कार्याला अभिवादन करून संविधान पत्रिकेचा वाचन करण्यात आले. विशेष करून पुरोगामी विचारांचा जागर करण्यात आला.


    यावेळी कै.श्री. रामकृष्ण मालू प्राथमिक विद्या मंदिरचा इयत्ता दुसरीत शिकणारा कु.रविराज गीता प्रभाकर माने या विद्यार्थ्याने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा संपूर्ण जीवन परिचय आपल्या ओघवत्या शैलीत व दमदार भाषणातून मांडला. यावेळी त्यांने डॉ.बाबासाहेबांचा  विद्यार्थी दशेपासून ते महापरिनिर्वाण दिनापर्यंतचा संघर्षमय प्रवास मांडला. संविधान निर्माता, आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रज्ञ, कृषी तज्ञ, जलसिंचन मंत्री, समाज शास्त्रज्ञ, कायदे पंडित, थोर विचारवंत, संवेदनशील व्यक्तिमत्व, बहुजनांचे कैवारी, दलितांचे उद्धारकर्ते व बौद्ध धर्म उपासक या सर्व भूमिकेतून उल्लेखनीय कार्य केले असल्याबाबतचे मत व्यक्त केले. तसेच सक्षम राष्ट्रनिर्मिती व या देशातील प्रत्येक घटकाचा विचार करून निर्माण केलेल्या संविधान या विषयी मत व्यक्त केले.

     कु.रविराज माने या विद्यार्थ्यास प्रेरणा देण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते एडवोकेट मा.शितल कांबळे, सामाजिक कार्यकर्ते मा. सचिन डोंगरे व चंद्रकांत चव्हाण सर यांनी त्याला बक्षीस रुपी रोख रक्कम प्रदान केली.

     या जयंती सोहळ्यास माजी नगरसेवक कॉम्रेड मा.रघुनाथ देशिंगे, आंदोलन अंकुशचे प्रमुख मा.धनाजी चुडमुंगे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा नेते व माजी नगरसेवक मा.शैलेश चौगुले, माजी नगरसेवक बजरंग खामकर,सामाजिक कार्यकर्ते आदमभाई मुजावर, कैलास काळे,अभिजीत भैय्या भांदिगिरे,सामाजिक कार्यकर्ते सागर माने, बाळासाहेब वगरे, प्रकाश पवार, फारूक कडबी,चंद्रकांत चव्हाण, निर्भीड पत्रकार इकबाल इनामदार, अमर पाटील, मुन्ना शेख, गोपाळ गायकवाड,सुनील खराडे, संभा पवार,संदेश, अमृत तिवडे, संजय पेटकर हे मान्यवर उपस्थित होते.

      एडव्होकेट शितल कांबळे यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले.तर प्रास्ताविक इकबाल इनामदार यांनी केले. आभार सागर माने यांनी मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा