*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
जयसिंगपूर : बलशाही भारतासाठी लोकशाही पद्धतीने मतदान प्रक्रिया निकोप व सुरळीतपणे पार पाडणे गरजेचे असते.यासाठी निवडणूक प्रक्रिया यशस्वी होण्यासाठी परिपूर्ण व प्रशिक्षित निवडणूक अधिकारी व कर्मचारी असणे महत्त्वाचे असते. या प्रथम प्रशिक्षण कार्यशाळेच्या माध्यमातून तशा प्रकारची सक्षम व निवडणूक प्रक्रिया हाताळणारी अधिकारी व कर्मचारी निर्माण होत असतात.या अनुषंगाने तशा प्रशिक्षण कार्यशाळेची व्यवस्था करण्यात आलेली आहे. या देशातील तमाम मतदारांनी मतदान प्रक्रियेमध्ये सक्रिय सहभाग नोंदविणे गरजेचे आहे अर्थात सक्रिय मतदार व निकोप मतदारांच्या माध्यमातून लोकशाही सक्षम व प्रगल्भ होऊ शकते असे मत अप्पर जिल्हाधिकारी मा.संजय शिंदे यांनी प्रथम प्रशिक्षण कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी मांडले. याप्रसंगी सौ. मोहिनी चव्हाण सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा पुरवठा अधिकारी, मा.अनिलकुमार हेळकर अति-सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा शिरोळ तहसीलदार व शिरोळ नायब तहसीलदार योगेश जमदाडे उपस्थित होते.
या प्रशिक्षण कार्यशाळेत मार्गदर्शन करताना सौ. मोहिनी चव्हाण (उपजिल्हाधिकारी - सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी) म्हणाल्या, सदर प्रशिक्षण कार्यशाळेतील नियुक्त मतदान अधिकारी व कर्मचारी यांनी उत्तम प्रशिक्षणाच्या माध्यमातून मतदान प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडावी. यासाठी सदरचे प्रशिक्षण असून प्रशिक्षणार्थ्यांनी मतदान प्रक्रिया यशस्वी होण्यासाठी योग्य व परिपूर्ण माहिती घ्यावी. आपल्या प्रश्नांचे निराकरण करून घ्यावे. या निवडणूक प्रक्रियेतील काही तांत्रिक बाबी याबाबत ही प्रशिक्षणार्थींना उदबोधित केले.
अतिरिक्त सहाय्यक निवडणूक अधिकारी मा. अमर रसाळ यांनी संपूर्ण निवडणूक प्रक्रिये बाबत उत्तम मार्गदर्शन केले.तसेच केंद्रीय पातळीवर बदललेल्या मतदान प्रक्रिये संदर्भातील सविस्तर माहिती दिली.
या निवडणूक प्रक्रियेतील विशेष बाब सांगताना अप्पर जिल्हाधिकारी, संजय शिंदे म्हणाले, महिला निवडणूक कर्मचारी यांची नियुक्ती संबंधित विधानसभा क्षेत्रात केली जाणार आहे.
मुख्याध्यापक,सुनील कोळी,मतदान अधिकारी
निवडणूक प्रशिक्षण शिबिराच्या पहिल्या व दुसऱ्या सत्रात निवडणूक बाबत माहिती देण्यात आली असून याबरोबर Handson ट्रेनिंग देण्यात आले.सदरचे पहिले प्रशिक्षण कार्यशाळा जयसिंगपूर नगरपरिषद, जयसिंगपूर सहकार महर्षी शामराव पाटील यड्रावकर नाट्यगृहात यशस्वीपणे संपन्न झाले.
जय हिंद न्यूज नेटवर्कशी बोलताना प्रशिक्षण शिबिरार्थी म्हणाले, सदरची प्रशिक्षण कार्यशाळा उत्तम प्रशिक्षण व परिपूर्ण Handson ट्रेनिंगच्या माध्यमातून यशस्वीपणे संपन्न झाली आहे. तसेच विचारलेला प्रश्नांचं उत्तम पद्धतीने निराकरण करण्यात आले. या प्रशिक्षणाच्या माध्यमातून लोकसभा निवडणूक प्रक्रिया व्यवस्थितपणे हाताळता येईल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा