![]() |
मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांना मार्गदर्शन करताना उपजिल्हाधिकारी सौ. मोहिनी चव्हाण, शिरोळ तहसीलदार मा. अनिलकुमार हेळकर व तहसीलदार मा.रसाळ |
*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
जयसिंगपूर : जागतिक पटलावर जागतिक निकषाद्वारे लोकशाही निर्देशांकामध्ये भारतीय लोकशाही ही सक्षम व अन्य राष्ट्रांना मार्गदर्शक ठरत असून याचे मुख्य कारण भारतीय निवडणूक प्रक्रिया ही पारदर्शक व प्रामाणिकपणे हाताळली जात आहे.यासाठी मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून लोकशाही जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. यामुळे तमाम भारतीय जनतेचा व मतदारांचा लोकशाही प्रक्रियेवर अगाध विश्वास आहे. किंबहुना विदेशात लोकशाहीवरचा विश्वास कमी होत असून या प्रक्रियेत महिलांना गौण स्थान दिले जात आहे. अशा परिस्थितीत मात्र भारतात श्रीमंत, गरीब,लिंग,जात, धर्म,प्रदेश व शिक्षण असा कोणताही भेदभाव न करता सर्व घटकांना समान मताधिकार दिला आहे.'एक व्यक्ती - एक मत' ही प्रक्रिया कायदा व सुव्यवस्था अबाधित राखीत अत्यंत सुगम पद्धतीने निवडणूक प्रक्रिया राबवली जात आहे. यासाठी मात्र राष्ट्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसारच मतदान केंद्राध्यक्ष पासून ते कर्मचाऱ्यांपर्यंत उत्तम प्रशिक्षण दिले जात असून ही मतदान प्रक्रिया उत्तम राबवली जात आहे. यामुळे भारतीय लोकशाहीचा सर्वत्र बोलबाला असल्याचं मत सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी सौ. मोहिनी चव्हाण यांनी मांडले.
![]() |
कार्यशाळेतील प्रशिक्षणार्थ्यांना मार्गदर्शन करताना तहसीलदार मा.अनिलकुमार हेळकर |
या कार्यशाळेत अतिरिक्त निवडणूक निर्णय अधिकारी तथा शिरोळचे तहसीलदार मा.अनिलकुमार हेळकर यांनी संपूर्ण मतदान प्रक्रिये बाबत सविस्तरपणे व प्रश्नांचं निरसन करीत उत्तम पद्धतीने मार्गदर्शन करून उपस्थित प्रशिक्षणार्थ्यांच्या मध्ये मतदान प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडण्याचा विश्वास निर्माण केला. त्याचबरोबर त्यांच्यामध्ये राष्ट्रीय जबाबदारीची जाणीव निर्माण केली.
मा. हेळकर यांनी मतदान प्रक्रिये बाबत उद्बोधन करताना होम वोटिंग,मतदानासाठी सुविधा केंद्र, मतदान प्रक्रियेतील टप्पे, निवडणुकीतील महत्वाचे बदल व निवडणुकीचे नवीन निर्देश या बाबीवर प्रकाश टाकला. त्याचबरोबर उत्तम पद्धतीने माहिती देऊन प्रशिक्षणार्थीने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देऊन त्यांना योग्य पद्धतीने उद्बोधित केले.
याप्रसंगी तहसीलदार मा. रसाळ यांनी अत्यंत सूक्ष्म पद्धतीने निवडणूक प्रक्रियेच्या.काही बाबींच्या वर कटाक्ष टाकून त्याची माहिती दिली. निवडणूक प्रक्रिया डेमो व्हिडिओच्या माध्यमातून प्रक्रिया समजावून सांगण्याचा प्रयत्न केला.
प्रशिक्षण कार्यशाळेच्या सांगता कार्यक्रमात नविद पटेल या एका प्रशिक्षणार्थीने या प्रशिक्षण शिबिराबाबत आपले सकारात्मक मत व्यक्त करून सर्वांच्या वतीने आभार मानले.
दुसऱ्या सत्रात सर्वांना Handson ट्रेनिंग दिले. यावेळी प्रशिक्षणार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधान व कृतीमध्ये विश्वास जाणवत होता. सदरची प्रशिक्षण कार्यशाळा नियोजनबद्ध व खेळीमेळीच्या अर्थात प्रसन्न वातावरणात उत्तम पद्धतीने संपन्न झाल्याची चर्चा शिबिरार्थींच्या मध्ये होती.
सदरचे मतदान अधिकारी प्रशिक्षण शिबिर यशस्वी होण्यासाठी जिल्हाधिकारी मा. अमोल येडगे व अप्पर जिल्हाधिकारी मा. संजय शिंदे यांची प्रेरणा,उत्तम मार्गदर्शन व सहकार्य लाभले.रविवार दिनांक ७ एप्रिल,२०२४ रोजी पहिले व दुसरे आणि सोमवार दिनांक ८ एप्रिल, २०२४ रोजी तिसरे आणि चौथे 'मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी प्रशिक्षण कार्यशाळा' उत्तम व यशस्वीपणे संपन्न झाली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा