Breaking

सोमवार, १५ एप्रिल, २०२४

*देशाची लोकशाही बळकट होण्यासाठी ; सरासरी मतदानापेक्षा उच्चत्तम मतदान होणेकरिता सर्वांनी सक्रिय व प्रयत्नशील रहा : मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांचे आवाहन*


कोल्हापूर जिल्हा लोकसभा निवडणूक २०२४ च्या पार्श्वभूमीवर भारताचे मुख्य निवडणूक अधिकारी मा.चोक्कलिंगम यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर येथे बैठक संपन्न याप्रसंगी जिल्हाधिकारी अमोल येडगे, अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन , जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, उपवनसंरक्षक गुरुप्रसाद,  अपर जिल्हाधिकारी सुरेश जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, समाधान शेंडगे आदी 


*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात आत्तापर्यंत सर्व निवडणुकांमध्ये मतदान चांगले झाले असून सध्याच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये देश व राज्यांच्या तुलनेत सरासरी मतदानापेक्षा उच्चतम मतदान होण्यासाठी मतदान जनजागृती वर भर देणे गरजेचे आहे अशा सूचना भारताचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी दिल्या आहेत.

      प्राप्त झालेल्या माहितीनुसार, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी कोल्हापूर जिल्ह्याला भेट दिली. त्यांच्या अध्यक्ष खाली जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व नोडल अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यात आली.

      *या बैठकीत एस. चोक्कलिंगम यांच्या १० विशेष सूचना केल्या.*

) देशाची लोकशाही अधिक सुदृढ करण्यासाठी प्रत्येक मतदारांनी मतदान करणे आवश्यक आहे.

२) जिल्ह्यात प्रत्येक मतदान केंद्रावर ९०% होऊन अधिक मतदान होण्यासाठी प्रयत्न द्या.

३) मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर बक्षीस योजना राबवून अधिकाधिक मतदान होण्यासाठी प्रयत्न करा. 

४) मतदाराच्या जनजागृतीवर भर देण्याबरोबरच यापूर्वी कमी मतदान झालेल्या भागावर ग्रामीण भागावर अधिक लक्ष केंद्रित करून मतदानाची टक्केवारी वाढवावी. यासाठी विविध स्वयंसेवी संस्था व संघटनांचे सहकार्य घ्या.

५) कामगारांनी मतदान करावे यासाठी विविध औद्योगिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यासोबत व कंपन्यांच्या मालकासोबत बैठक घ्या. 

६) मतदानासाठी कामगारांना भरपगारी सुट्टी जाहीर केल्या असून मतदानाशिवाय मालक व कामगारांनी मतदान करून राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे. 

७) रांग विरहित मतदान केंद्रासाठी भर देण्याबाबत ही सुतवाच केला. यासाठी प्रत्येक मतदान केंद्रस्थळी प्रतीक्षा कक्ष स्थापन करा, जेणेकरून मतदारांना रांगेत उभे राहावे लागणार नाही.  

८) दिव्यांग मतदारांना व्हीलचेअर व अन्य आवश्यक त्या सुविधा द्या. 

९) सर्व तपासणी नाके व जिल्ह्याच्या सीमावर येणाऱ्या वाहनांची कडक तपासणी करून संशयित रक्कम आढळल्यास संबंधितावर कारवाई करा. 

१०) आचारसंहिता भंगाच्या घटना आढळून आल्यास तत्काळ गुन्हे दाखल करून आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होणार नाही याची खबरदार घ्या.

    या बैठकीस कोल्हापूरचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी मा. अमोल येडगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन , जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, उपवनसंरक्षक गुरुप्रसाद, अपर जिल्हाधिकारी तथा हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी संजय शिंदे, अपर जिल्हाधिकारी सुरेश जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, समाधान शेंडगे, उपजिल्हाधिकारी तथा हातकणंगले लोकसभा सहाय्यक निवडणूक अधिकारी सौ. मोहिनी चव्हाण आदी प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा