![]() |
जयसिंगपूर येथे मतदान जनजागृती रॅलीच्या शुभारंभप्रसंगी उपमुख्याधिकारी प्रमिला माने पालिकेचे अधिकारी व कर्मचारी |
*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
जयसिंगपूर : लोकसभा निवडणूकीच्या ,२०२४ च्या पार्श्वभूमीवर जयसिंगपूर नगरपरिषदेच्यावतीने मंगळवारी (ता.१६) शहरातून मतदान जनजागृती रॅली काढण्यात आली. मुख्याधिकारी श्रीमती टिना गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली ही रॅली काढण्यात आली.
हातकणंगले लोकसभा मतदार संघाच्या सार्वत्रिक निवडणुकीला प्रारंभ झाला आहे. त्यामुळे निवडणूक अधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार मतदारांमध्ये जागृती करण्यात येत आहे. प्रशासकीय यंत्रणेच्या माध्यमातून जनजागृती सुरू आहे. रॅलीत 'वृद्ध असो की जवान अवश्य करा मतदान', 'आपल्या मतामुळे लोकशाहीचा होणार सन्मान अवश्य करा मतदा' अशा घोषणा देण्यात आल्या. शहरात नगरपरिषदेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्याकडून पदयात्रा काढून शहरातील मतदारांमध्ये मतदान जनजागृती करण्यात आली. कर्मचाऱ्यांनी 'आपल्या मतामुळे होणार लोकशाहीचा सन्मान अवश्य करा मतदान' अशा विविध घोषणा देत मतदारांमध्ये जनजागृती करण्यात आली. या दरम्यान मतदान करण्यासंदर्भात सामुदायिक शपथ घेण्यात आली. कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता मतदान हे कर्तव्य समजून करण्याचा यावेळी निश्चय करण्यात आला. या उपक्रमात उपमुख्याधिकारी मा.प्रमिला माने यांच्यासह नगरपरिषदेच्या विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा