![]() |
खासदार कसा असावा? |
*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
जयसिंगपूर : भारतीय राज्यघटनेच्या कलम ८३ नुसार लोकसभेच्या निवडणुका दर पाच वर्षांनी घेतल्या जातात. लोकसभा निवडणूक २०२४ च्या पार्श्वभूमीवर आपापल्या मतदारसंघात लोकप्रतिनिधी अर्थात खासदार कसा असावा? याबाबत लोकांचे अज्ञान असते. लोकप्रतिनिधी कसा असावा याबाबत मतमतांतरे असतात. सर्वसामान्य जनतेला खासदाराकडून काय अपेक्षा आहेत किंवा खासदार ची भूमिका काय? याबाबत संभ्रम असतो. कोणत्याही वस्तूची खरेदी करत असताना आपण सारासार विचार करत असतो. तसाच विचार खासदार निवडत असताना केला पाहिजेत. यासाठी खासदारा कडून काही व्यावहारिक व आदर्शवत अपेक्षा खालील प्रमाणे आहेत.
१) भारतीय संविधान व तिरंगा यांना प्रथम प्राधान्य देऊन देश विकासासाठी काम करणारा एक सच्चा समाजसेवक रुपी नेता असावा.
२) मतदार संघात फिरून समाजातील सर्व घटकांचे कोणते प्रश्न आहेत याचा अभ्यास करून त्याविषयी प्रश्न संसदेत मांडावेत.
३) सर्व सोयी नियुक्त अभ्यास केंद्र व उच्चशिक्षित मार्गदर्शक स्पर्धा परीक्षा केंद्र उपलब्ध करून देणारा असावा.
४) शिक्षण क्षेत्रातील विविध योजनांना चालना देऊन त्यांना नोकरी मिळवून देणारा असावा.
५) आपल्या मतदारसंघातील प्रत्येक विद्यार्थ्यांच्या सर्व प्रकारच्या प्रश्नाकडे जाणीवपूर्वक लक्ष घालून प्रश्न मार्गी लावणार असावा.
६) बेरोजगाराचा प्रश्न सोडवण्यासाठी युवकांना कृषी व औद्योगिक क्षेत्रातून रोजगार देऊन सक्षम करणारा असावा.
७) लोकप्रतिनिधी उच्च शिक्षणाबरोबर विविध संस्कारानी परिपूर्ण असावा.
८) मतदारसंघातील युवकांना रोजगार देण्यासाठी रोजगार मार्गदर्शन मेळावा घेणार असावा.
९) लोकप्रतिनिधी शांत, संयमी, प्रामाणिक व परिस्थितीनुरूप लोकांचे प्रश्न हाताळणारा असावा.
१०) लोकप्रतिनिधी हा छत्रपती शिवराय, महात्मा फुले, छत्रपती शाहू व डॉ. आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारांचा पुरस्कर्ता असावा.
११) जात,धर्म ,पंथ, लिंग, प्रदेश व विशिष्ट समुदायाचा विचार करणारा नसावा.
१२) देशाच्या विकासाचे परिपूर्ण व्हीजन असणारा असावा.
१३) शेतकरी,कामगार, दलित- आदिवासी या घटकांना प्राधान्य देऊन त्यांच्या विकासासाठी चौफेर कामगिरी करणारा असावा.
१४) लोकप्रतिनिधी जनशक्तीच्या जोरावर सामान्यांचा आवाज बुलंद करणारा असावा.
१५) मतदार संघातील सर्व प्रकारची पायाभूत सुविधा निर्माण करून लोकांच्या सेवेसाठी कटिबद्ध असावा.
१६) घराणेशाहीचा वारसा नसलेला उमेदवार असावा.
१७) उमेदवाराचा नैतिक व राजकीय, सामाजिक पार्श्वभूमी ही स्वच्छ व पारदर्शक असावी.
१८) उमेदवाराचा प्रचार स्वतः लोकांनी सहभागी होऊन आर्थिक मदत करून करावा.
१९) उमेदवाराने लोकांच्या विकासासाठी स्वतःवर गुन्हे घेतलेले असावेत.
२०) उमेदवार हा जातीपेक्षा त्याच्या कर्तुत्वाने लोकांच्या मध्ये त्याची कर्तव्यदक्ष व कार्यक्षम व्यक्ती म्हणून स्वच्छ प्रतिमा असावी.
२१) लोकप्रतिनिधी हा विविध चळवळीत सहभागी होऊन स्वतःच्या रक्ताचं पाणी करणार असावा.
२२) मतदार संघात विविध नैसर्गिक आपत्ती महापूर, जल समस्या, प्रदूषण समस्या व अन्य प्रकारच्या निर्माण झालेल्या आपत्तीचे निराकरण करणारा असावा.
२३) लोकप्रतिनिधी किती उत्तम बोलतो व दिसतो यापेक्षा तो नेमक्या पणाने व जबाबदारीने काम करणारा असावा.
२४) सोयीनुसार राजकारण करणारा किंवा दुसऱ्या पक्षात प्रवेश करणारा नसावा.
२५) काळ्या पैशाच्या माध्यमातून आर्थिक साम्राज्य निर्माण केले असेल तर अशा उमेदवाराला भविष्यात ED किंवा तो अडचणीत येत असेल तर अशा उमेदवारापासून आत्ताच दूर राहावे.
२६) निवडणुकीच्या काळात उमेदवाराकडून विविध गोड भूलथापा किंवा आमिष दाखवून किंवा अन्य उमेदवाराविषयी जाणीवपूर्वक विषारी विचार मांडून मतदारांना आकर्षित करत असेल तर अशा उमेदवारापासून सावधान रहा.
२७) उमेदवाराचं स्वतःचं एक निश्चित तत्व व विचार असावेत. जेणेकरून देशातील सर्वसामान्यांचे मूलभूत प्रश्न मार्गी लावावेत.
सुज्ञ मतदार बंधू भगिनींनो वरील सर्व मुद्द्यांचा विचार करून आपला खासदार किंवा लोकप्रतिनिधी कसा असावा याचा सारासार विचार करून मतदान करावे. मतदान करणे हा आपला हक्क आहे. तो केलाच पाहिजे. या विषयी शंका नाही.
चला मतदान करूया ! राष्ट्र घडवूया! प्रगल्भ लोकशाहीसाठी : सक्षम राष्ट्रासाठी आपलं मत बहुमोल आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा