Breaking

गुरुवार, २ मे, २०२४

*जयसिंगपूर कॉलेजचा विद्यार्थी आदित्य राजेश काकडे याची मर्चंट नेव्ही मध्ये निवड*


श्री. आदित्य राजेश काकडे याची जपानीज कंपनीच्या मर्चंट नेव्ही मध्ये निवड

*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


जयसिंगपूर : जयसिंगपूर येथील श्री.आदित्य राजेश काकडे याची मर्चंट नेव्ही मध्ये निवड झाली असून तो जयसिंगपूर कॉलेज जयसिंगपूरच्या राज्यशास्त्र विभागाचा विद्यार्थी आहे. 

     आदित्य काकडे हा १२ वी सायन्स झाल्यानंतर मर्चंट नेव्ही मध्ये सहभागी होण्यासाठी संबंधित कोर्स केला. कोर्स पूर्णत्वानंतर परीक्षेची कठीण काठिण्य पातळी व मुलाखतीच्या  आधारावर त्याची MOL अर्थात Mitsui Osk Line या जपानच्या नामवंत कंपनीमध्ये निवड झाली. सदरची मर्चंट नेव्ही कंपनी ही जगातील पाच अव्वल कंपन्यामध्ये तिचे स्थान आहे.कंपनीचे स्व:मालकीचे 1350 जहाज आहेत. अशा कंपनीमध्ये आदित्यला नोकरी मिळाली आहे. या कामानिमित्त आदित्यचा 4 ते 5 देशांमध्ये त्याचा प्रवास सुरू असतो. पुढील ऑफिसर पोस्टसाठी तो परीक्षेची तयारी करीत असून इंग्लंडला एका वर्षाकरिता कोर्ससाठी जात आहे.

    निसर्गदत्त मिळालेली ६ फूट २ इंच उंची, भारदस्त आवाज, बुद्धीचातुर्य व निर्भीडपणा,चळवळीच्या माध्यमातून तयार झालेलं बहुआयामी व्यक्तिमत्व हे त्याच्या व्यक्तिमत्त्वाची महत्त्वाची वैशिष्टये आहेत.मुळात आदित्य राजेश काकडे हा अत्यंत कष्टाळू, अभ्यासू, आजी-आजोबा व आई-वडिलांनी बालपणापासून दिलेल्या उत्तम संस्कारामुळे तो या महत्त्वाच्या पदापर्यंत पोहोचला.

      आदित्याचे वडील श्री.राजेश काकडे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. मुळात आदित्य चे वडील जयसिंगपूर कॉलेजमध्ये एनसीसीचे सीनियर अंडर ऑफिसर होते. सन १९८९ मधील अखिल भारतीय रायफल युद्धामध्ये सुवर्णपदक पटकावलं होते. तसेच सन १९९१ मध्ये आरडी परेड न्यू दिल्ली  येथे महाराष्ट्र एनसीसी ग्रुपचे नेतृत्व केले होते अशा या कर्तुत्वान वडिलांची प्रेरणा व आशीर्वाद लाभले. आदित्याची आई सौ. कल्याणी राजेश काकडे या माऊलीने बालपणापासून दिलेली वैचारिक व कृतीशील संस्कार, आरोग्याची घेतलेली काळजी हे वाखाण्याजोगे आहे. आदित्यचे भाऊ अमेय व आर्यन यांचेही सहकार्य लाभले.


    कॉलेजचे प्राचार्य डॉ.सुरत मांजरे, राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा.डॉ. खंडेराव खळदकर व इतर प्राध्यापकांनी दिलेली प्रेरणा, मार्गदर्शन व उत्तम सहकार्य यामुळे त्याला हे यश प्राप्त करता आले असे मत जय हिंद न्यूज नेटवर्क बोलताना त्यांनी सांगितले.

      त्याच्या पुढील वाटचालीस जय हिंद न्यूज नेटवर्क परिवाराच्यावतीने हार्दिक शुभेच्छा!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा