![]() |
लाच लुचपत प्रतिबंधक विभाग, सांगली |
सांगली : सातबारा नोंद करून उतारा देण्यासाठी दहा हजारांची लाच घेताना तडसर येथील तलाठी वैभव सुभाष तारळेकर (वय वर्ष ४५ रा. कृष्णा अपार्टमेंट कडेगाव - तडसर रस्ता कडेगाव मुळगाव सरस्वती नगर वासुंबे ता. तासगाव) यास रंगेहात पकडण्यात आले. लाच लुचपत विभागाच्या पथकाने आज त्यांच्यावर कारवाई केली.
तक्रारदार आणि त्यांचा पुतण्या याने एकमेकात शेत जमिनीची विक्री केली होती. त्याची सातबारा सदरी नोंद घेऊन त्याचा उतारा देण्याकरिता दोघेही तडसर येथील तलाठी वैभव तारळेकर यांच्याकडे गेले. त्यांनी याकरिता दहा हजारांची लाचेची मागणी केली. तक्रारदाराने या संदर्भातील अर्ज लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे दिला होता. तक्रार ची पडताळणी केली असता तलाठी वैभव तारळेकर यांनी लाचेची मागणी केल्याचं स्पष्ट झाले.
तलाठी तारळेकर यांने लाच देण्यासाठी तो राहत असलेल्या अपार्टमेंटच्या परिसरात तक्रारदारास बोलविले होते. पोलीस विभाग अधिक तपास करीत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा