Breaking

बुधवार, १९ जून, २०२४

*जयसिंगपूरच्या श्रीमती यशोदा मालू शिशु मंदिरात नवागत विद्यार्थ्यांचे अभिनव पद्धतीने प्रवेशोत्सव संपन्न*


श्रीमती यशोदा मालू शिशु मंदिरात प्रवेशोत्सव संपन्न


*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


जयसिंगपूर : श्रीमती यशोदा मालू शिशु मंदिर जयसिंगपूर या शाळेतील पूर्व गटातील विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव अत्यंत उत्तम व अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला.

     शालेय परिसरात विद्यार्थी व पालकांची प्रचंड गर्दी होती. नवागत विद्यार्थी व पालक आनंदाने भारावून गेले होते. शाळेचे मुख्याध्यापक मा. सुनील कोळी यांनी उपस्थित सर्व विद्यार्थी व पालक यांचे मनापासून स्वागत करून प्रवेशोत्सव साजरा करण्यासंदर्भातचा हेतू स्पष्ट केला.

       नवागत विद्यार्थी व पालक प्रवेशोत्सवाला  प्रारंभ झाला. शिक्षकाकडून विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प व पेढे देऊन आनंदी वातावरणात स्वागत केले.

    या प्रवेशोत्सव प्रसंगाचे वैशिष्ट्य म्हणजे) विद्यार्थ्यांसाठी सेल्फी पॉईंट ची व्यवस्था करण्यात आली होती. २) प्रारंभी स्वागत करणारे सुंदर असे अनोख्या पद्धतीचे डिजिटल फलक लावण्यात आले होते. ३) अत्यंत सुंदर पद्धतीने डेकोरेशन करून नवा विद्यार्थ्यांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करण्यात आला.४) नवागत विद्यार्थी व पालक यांच्यामध्ये प्रचंड उत्साह होता.५) मुलांच्यासाठी ग्रीन कार्पेट व रेड कार्पेट टाकण्यात आले होते.६)मुख्याध्यापक मा. सुनील कोळी व त्यांच्या पूर्ण टीमने अत्यंत सुंदर व नेटक्यापणाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.६) नवागत विद्यार्थ्यांचा वर्ग  फुले व फुग्यानी सुंदरपणे सजवलेला होता. ७) विद्यार्थी, पालक व शिक्षक यांच्या चेहऱ्यावर प्रसन्नता जाणवत होती.

      नवचैतन्य व सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारा हा नवागत विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव सोहळा विद्यार्थी व पालकांसाठी एक अनोखा व मनात घर निर्माण करणारा आठवणीचा सोहळा होता.

      या प्रवेशोत्सवासाठी स्कूल कमिटीचे सदस्य व माजी नगरसेवक मा.चंद्रकांत जाधव सल्लागार समितीचे सदस्य मा. प्रसन्न कुंभोजकर, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य मा. फिरोज अत्तार, सौ.शोभा पाटील, सौ शिल्पा पिसे, सौ.घोरपडे व सौ.पाटील उपस्थित होते

   उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नवागत प्रवेश घेतलेले बालकांचे पुष्पगुच्छ देऊन औक्षण करून व पेढे देऊन स्वागत करण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा