![]() |
आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टर मा.तेजस जोंधळे, हेरवाड |
*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
जयसिंगपूर : हेरवाड येथील आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टर खेळाडू तेजस जोंधळे याची खेळाडू कोट्यातून भारतीय रेल्वे खात्यात टीसी पदावर निवड करण्यात आली आहे.
तेजस जोंधळे यांने वेटलिफ्टिंग च्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावर सुवर्णपदकाची कमाई करून देशाचे तसेच राज्याचे नाव कानाकोपऱ्यात नेले आहे. याचबरोबर यावर्षीच्या इंडिया युनिव्हर्सिटी स्पर्धेत गोल्ड मेडल ज्युनिअर वेटलिफ्टिंग स्पर्धेत सुवर्णपदकाची नुकतीच त्यांनी कमाई केली आहे. त्याच्या या यशाबद्दल खेळाडू कोट्यातून त्याची नुकतीच भारतीय पश्चिम रेल्वेच्या टीसी पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
संस्थेचे चेअरमन डॉ. सुभाष अडदंडे, सचिव डॉ. महावीर अक्कोळे, खजिनदार मा. पद्माकर पाटील, संस्थेचे सर्व पदाधिकारी, प्राचार्य डॉ. सुरत मांजरे यांनी शुभेच्छा देऊन त्याचे मनस्वी अभिनंदन केले आहे.
अत्यंत नम्र, शिस्तबद्ध असणारा,प्रामाणिक व कष्टाळू व उद्दिष्ट निहाय क्रीडा सराव करणारा तेजस जोंधळे या क्रीडापटूच्या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदनचा वर्षा होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा