Breaking

मंगळवार, २५ जून, २०२४

*कुरुंदवाड आगार मार्फत जयसिंगपूर कॉलेजच्या विद्यार्थिनींना मोफत एसटी पास वाटप*

 

प्राचार्य डॉ. सुरत मांजरे, कुरुंदवाड आगारचे अधिकारी मा. नामदेव पतंगे, मा. भोसले, मा.गवळी साहेब , उपप्राचार्य प्रा.भारत व पर्यवेक्षक डॉ.महावीर बुरसे विद्यार्थ्यांना मोफत पास वाटप करताना


*प्रा.डॉ. महावीर बुरसे : उपसंपादक*


जयसिंगपूर : अनेकांत एज्युकेशन सोसायटीच्या जयसिंगपूर कॉलेज जयसिंगपूर येथे सोमवार दिनांक २४ जून २०२४ रोजी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ मंडळाच्या वतीने पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर मोफत एसटी बस पास योजनेअंतर्गत बारावीच्या १४० विद्यार्थिनींना मोफत पासचे वितरण करण्यात आले.

      ग्रामीण भागातील मुलींना शिक्षणासाठी वेळेत,सुरक्षित व मोफत प्रवास करता यावा, यासाठी महाराष्ट्र शासनाने ही योजना सुरू केली आहे. मा.नामदेव पतंगे, मा.भोसले व मा.गवळी या अधिकाऱ्यांनी  महामंडळाकडून विद्यार्थी व नागरिकांसाठी दिल्या जाणाऱ्या विविध लाभदायक योजनांची सविस्तर माहिती दिली. तसेच एसटी चा वापर योग्य पद्धतीने केल्यास एसटी बसचा प्रवास फायदेशीर होतो. एसटीचे नुकसान म्हणजे शासनाचे किंबहुना जनतेचे नुकसान असल्याचेही ते म्हणाले. यासाठी एसटी बसचे कोणत्यही प्रकारे नुकसान करू नये.

    याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुरत मांजरे यांनी कुरुंदवाड  व जयसिंगपूर डेपोचे अधिकारी यांचे स्वागत करून एस टी महामंडळाचे विशेष कौतुक केले.

   सदर कार्यक्रमास ज्युनिअर विभागाचे उपप्राचार्य प्रा.भारत आलदर, डॉ. महावीर बुरसे, डॉ. प्रभाकर माने, ज्युनिअर विभागातील शिक्षकवृंद व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

     महाराष्ट्र शासनाच्या या एसटी मोफत बस पास योजने विषयी पालक, शिक्षक व विद्यार्थिनी कडून समाधान व आनंद व्यक्त होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा