Breaking

बुधवार, २६ जून, २०२४

*छ.शाहूंच्या पुरोगामी, समतावादी व कृतिशील विचारांच्या माध्यमातून मानवतावादी विचारांना बळ मिळणार : प्रा. सुरज चौगुले यांचे प्रतिपादन*


जयसिंगपूर कॉलेजमध्ये राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष व्याख्यानात मार्गदर्शन करताना प्रमुख वक्ते प्रा. सुरज चौगुले, प्राचार्य डॉ. सुरत मांजरे,उपप्राचार्य प्रा. भारत आलदर, पर्यवेक्षक डॉ. महावीर बोरसे व कार्यक्रम अधिकारी डॉ. खंडेराव खळदकर

*प्रा.डॉ. प्रभाकर माने :  मुख्य संपादक*


जयसिंगपूर : अनेकांत एज्युकेशन सोसायटीच्या जयसिंगपूर कॉलेज,जयसिंगपूर येथे 'राजर्षी छ.शाहू महाराज यांची शतकोत्तर सुवर्ण महोत्सव जयंती विशेष व्याख्यानाच्या' माध्यमातून साजरी करण्यात आली. याप्रसंगी  कोल्हापूर येथील इतिहास अभ्यासक व प्रमुख वक्ते प्रा. सुरज चौगुले यांनी छ.शाहूंच्या पुरोगामी, समतावादी व कृतिशील विचारांच्या माध्यमातून मानवतावादी विचारांना बळ मिळणार असल्याचे प्रतिपादन केले.अध्यक्षस्थानी कॉलेजचे प्राचार्य डॉ. सुरत मांजरे व उपप्राचार्य प्रा. भारत आलदर व सिने अभिनेते शशिकांत घाटगे उपस्थित होते.

    प्रा.सुरज चौगुले मार्गदर्शन करताना म्हणाले, छत्रपती शाहू महाराजांनी शेती व औद्योगिक विकासासाठी पायाभरणी केली. शिक्षणाच्या माध्यमातून समाजातील प्रत्येक घटकाला मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला.कला- सांस्कृतिक व  क्रीडाक्षेत्राला राजश्रय देऊन कलाकारांना व कुस्तीपटूंना प्रेरणा दिली. विविध सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून सामाजिक संस्थेची निर्मिती केली. समतावादी विचारांना बळ देत आरक्षणाची सुरुवात केली. कोणतीही गोष्ट करत असताना महाराजांनी दूरदृष्टी बाळगली होती.

    अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्राचार्य डॉ.सुरत मांजरे म्हणाले, राजर्षी शाहूंच्या विचारांमुळे कोल्हापूर किंबहुना महाराष्ट्राला पुरोगामी विचारांचे बळ मिळाले आहे. कोणत्याही चळवळीची सुरुवात छ.शाहू महाराजांच्या विचारांने व नावाने सुरू होते. त्यामुळे आजचा दिवस हा शाहू विचारांचा जागर करण्याचा आहे.

    व्याख्यानमालाचे वैशिष्ट्य म्हणजे अकरावी सायन्सचा विद्यार्थी जय शशिकांत घाटगे यांनी शाहू महाराजांची वेशभूषा परिधान करून सर्वांच्या आकर्षकांचा पात्र बिंदू ठरला.

     स्वागत व प्रास्ताविक डॉ.प्रभाकर माने यांनी केले.डॉ. खंडेराव खळदकर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.उपप्राचार्य प्रा. भारत आलदर यांनी आभार मानले.प्रा. सुनील चौगुले यांनी सूत्रसंचलन केले. 

     या कार्यक्रमाचे उत्तम नियोजन कार्यक्रम अधिकारी डॉ. खंडेराव खळदकर, डॉ. प्रभाकर माने, उपप्राचार्य प्रा. भारत आलदर व पर्यवेक्षक डॉ. महावीर बुरसे यांनी केले.

    सदर कार्यक्रमास कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, प्र.कुलगुरु डॉ.पी.एस. पाटील, कुलसचिव डॉ. विलास शिंदे, संचालक डॉ.तानाजी चौगले (राष्ट्रीय सेवा योजना कक्ष, शिवाजी विद्यापीठ,कोल्हापूर) यांची प्रेरणा व मार्गदर्शन व प्राचार्य डॉ.सुरत मांजरे यांचे विशेष सहकार्य लाभले.

     या कार्यक्रमास प्रा. बाळासाहेब पाटील, प्रा.सौ.अंजना चौगुले-चावरे, प्रा. शितल चौगुले, प्रा.सौ.रुपाली बस्तवाडे, कार्यालयीन अधीक्षक ए.बी. कांबळे, संजय चावरे, समृद्धी येलाज,ऋतुजा सावंत, एन.एस.एस. स्वयंसेवक विद्यार्थी, प्राध्यापक वृंद व प्रशासकीय कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा