Breaking

सोमवार, १० जून, २०२४

*जयसिंगपूरात लोकप्रिय तेजा फोटोग्राफी फर्मचा उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न*


जयसिंगपूर,तेजा फोटोग्राफी फर्म चे उद्घाटन संपन्न


*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


जयसिंगपूर : येथील सहाव्या गल्लीतील फॉर्च्यून प्लाझा येथेविविध क्षेत्रातील मान्यवरांसह मित्र परिवारांच्या उपस्थितीत तेजा फोटोग्राफी फर्मचा उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न झाला.या फर्मचे प्रमुख तेजस भंडारे यांच्या मातोश्री सौ. प्रभावती भंडारे व वडील अरुण भंडारे या दाम्पत्यांच्या हस्ते तेजा फोटोग्राफी फर्मचे उद्घाटन झाले .

    यावेळी सिनेअभिनेते व ज्येष्ठ पत्रकार डॉ.दगडू माने म्हणाले , युवा उद्योजक तेजस भंडारे यांचे फोटोग्राफी व्यवसायात चांगले कौशल्य आहे. उद्योग व्यवसायातील स्पर्धा व आव्हाने स्वीकारून अनेक तरुण उद्योजक स्वतः ची ओळख निर्माण करीत आहेत अशाच पद्धतीने जयसिंगपूर परिसरात तेजा फोटोग्राफी फर्म  ही नवी ओळख निर्माण करेल. माणसाच्या आयुष्याच्या फोटो आणि शूटिंग रूपाने प्रत्येक क्षणाच्या आठवणींचा एक अल्बम असतो . त्यामुळे आठवणीचा हा दस्तऐवज कौटुंबिक आणि मित्र परिवाराच्या नात्यामध्ये अधिक जिव्हाळा निर्माण करीत असतो. त्यामुळे युवा फोटोग्राफर तेजस भंडारे यांनी फोटोग्राफी - व्हिडिओग्राफी अशा नवनवीन साधनांच्या माध्यमातून चांगली ग्राहक सेवा करून व्यवसायात नावलौकिक मिळवावा अशा शुभेच्छा डॉ.दगडू माने यांनी दिल्या.

     यावेळी शिरोळ तालुका फोटोग्राफर अँड व्हिडिओग्राफर्स संस्थेचे अध्यक्ष राजू सावंत,कोल्हापूर जिल्हा भटक्या विमुक्त जाती - जमाती विकास मंडळाचे सचिव संजीव नाईक, माजी नगरसेवक बजरंग खामकर , चित्रपट निर्माते रामभाऊ लामदाडे,सैनिक वेल्फेअर असोसिएशन चे जिल्हाध्यक्ष संजय माने, शिरोळ शहर माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष संजय इंगळे,दानवाड आश्रम शाळेचे मुख्याध्यापक अनिल पाटील,भरत निर्मळ,सुभाष माने,स्वप्निल माने ,स्नेहल निर्मळे , रामदास भंडारे, प्रल्हाद साळुंखे, मा.राजपूत यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. 

       दरम्यान या उद्घाटन सोहळ्यानंतर सामाजिक , सहकार , राजकीय, कला व सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी सदिच्छा भेट देऊन तेजा फोटोग्राफी फर्म ला शुभेच्छा दिल्या.

     या फर्मच्या माध्यमातून जयसिंगपूर शहर व परिसरातील लोकांच्या समाधानकारक व गुणवत्तापूर्ण सेवेसाठी सदैव कटिबद्ध असल्याचे मत या फर्मचे प्रमुख तेजस भंडारे यांनी जय हिंद न्यूज नेटवर्कशी बोलताना मांडले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा