Breaking

सोमवार, १० जून, २०२४

*जयसिंगपूर कॉलेजमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरु ; विद्यार्थी संख्या मर्यादित*

 

जयसिंगपूर कॉलेज, जयसिंगपूर


*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


जयसिंगपूर  : अनेकांत एज्युकेशन सोसायटी बारामतीचे जयसिंगपूर कॉलेज जयसिंगपूर मध्ये शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ साठी बी.ए.,बी. कॉम. व बी.एस्सी.,बी.सी.ए., बी.सी.एस.,बी.वॉक प्रिंटिंग-प्रेस व ऑटोमोबाईल भाग -१ या पदवी शाखेच्या प्रवेश प्रक्रियेला प्रारंभ झाला आहे. या विभागाच्या जागा मर्यादित असल्याने विद्यार्थ्यांनी संबंधित विभागातील प्राध्यापकांशी लवकरात लवकर संपर्क साधावा.त्याचबरोबर एम.ए.अर्थशास्त्र, मराठी ,हिंदी, एम.कॉम. व एम.एस्सी. केमिस्ट्री या पदवीव्युत्तर विभागाच्या प्रवेश प्रक्रिया सुरू आहेत.

       अनुदानित तुकड्यांची प्रवेश संख्या मर्यादित असल्याने विद्यार्थ्यांनी आपला प्रवेश सुनिश्चित करण्यासाठी त्वरित कॉलेजशी संपर्क साधावा असे आवाहन प्राचार्य डॉ. सुरत मांजरे यांनी केले आहे.

     जयसिंगपूर कॉलेज हे हीरक महोत्सवी वर्ष साजरा करीत आहे. कॉलेजचे वैशिष्ट्य म्हणजे शिरोळ तालुक्यातील शैक्षणिक दृष्ट्या गुणवत्तापूर्ण व पायाभूत सोयीसुविधांनी सज्ज असे  एकमेव कॉलेज आहे. सदरचे कॉलेज हे शिवाजी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात लोकप्रिय असून क्रीडा,कला व सांस्कृतिक, स्पर्धा परीक्षा केंद्र, एन.सी.सी. व राष्ट्रीय सेवा योजना या विभागाच्या माध्यमातून विद्यार्थी व समाजाच्या सेवेसाठी कटिबद्ध आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा