Breaking

बुधवार, २४ जुलै, २०२४

*जयसिंगपूरच्या डॉ.मगदूम अभियांत्रिकीच्या ०६ विद्यार्थ्यांची टी.सी.एस. कंपनीत निवड*


डॉ.जे.जे. मगदूम ऑफ इंजीनियरिंग कॉलेज, जयसिंगपूर

*भोलू शर्मा : विशेष प्रतिनिधी*


    जयसिंगपूर : टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस ( टीसीएस ) या कंपनीमध्ये डॉ.जे जे मगदूम कॉलेज ऑफ इंजीनियरिंगच्या ०६ विद्यार्थ्यांची कॅम्पसद्वारे नोकरीसाठी निवड झाली आहे. विद्यार्थ्यांना  वार्षिक ३. ३६ लाख व ७ लाखाचे पॅकेज असून सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून त्यांची निवड झाली आहे.

      महाविद्यालयातील कॉम्प्युटर विभागाचे प्रथमेश कुंभार, दीप कुलकर्णी, बालाजी झारे , प्रसन्न चौगुले व आय.टी. विभागाची अवंतिका जांभळे या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.

       टी.सी.एस. ही भारतातील सॉफ्टवेअर क्षेत्रातील एक नामांकित कंपनी आहे. महाविद्यालयाचा या कंपनीशी सामंजस्य करार झालेला आहे या कराराद्वारे विद्यार्थ्यांना इंटर्नशिप देणे व पात्र विद्यार्थ्यांची नोकरीसाठी निवड करणे असे उपक्रम राबवले जातात.

     ट्रस्टचे चेअरमन डॉ. विजयराज मगदूम, व्हाईस चेअरपर्सन डॉ.सौ. सोनाली मगदूम, कॅम्पस डायरेक्टर डॉ.सुनील आडमुठे, प्राचार्य डॉ. गोपाळ मुलुंगुंड यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.निवड झालेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. पी.पी. माळगे, डिपार्टमेंटल  कॉर्डिनेटर प्रा. रोहित माने व सायली होळकर यांचे सहकार्य मिळाले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा