Breaking

मंगळवार, १६ जुलै, २०२४

*गुणवत्तापूर्ण शिक्षण व उत्तम कॅम्पस नियोजनामुळे डॉ.जे. जे. मगदूम अभियांत्रिकी कॉलेजला विद्यार्थी व पालकांची प्रथम पसंती*

 

डॉ.जे. जे. मगदूम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, जयसिंगपूर


*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


  जयसिंगपूर  :  येथील डॉ. जे. जे. मगदूम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये दिनांक १४ जुलै पासून इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रिया २०२४ सुरू झाली आहे. फॉर्म भरण्याची अंतिम तारीख २४ जुलै असून, २५ जुलै अखेर कागदपत्राची पडताळणी करून घ्यावी लागणार आहे. रजिस्ट्रेशन साठी  पहिल्याच दिवशी विद्यार्थी व पालकांनी उत्तम प्रतिसाद मधून प्रथम पसंती दिली आहे.

    रजिस्ट्रेशन प्रक्रिये वेळी घ्यावी लागणारी काळजी, आवश्यक कागदपत्रांविषयी मार्गदर्शन व फॉर्म भरण्याची सुविधा महाविद्यालयाने मोफत उपलब्ध करून दिली आहे. त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन  महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गोपाळ मुलगुंद यांनी केले आहे. प्रवेश प्रक्रियेचे कामकाज कॅम्पस डायरेक्टर  डॉ. एस. एस. आडमुठे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. डी. बी. उंडे (प्रथम वर्ष), डॉ. एस. एम. अत्तार (द्वितीय वर्ष), प्रा. सौ. ए. पी. चौगुले (एम. टेक.), प्रा. पी. व्ही. कोठावळे (एम.सी. ए.) व त्यांचे सहकारी करीत आहेत.

     अधिक माहितीसाठी प्रा. एम.बी. भिलवडे यांच्याशी ९४२०६७५८६१  संपर्क साधावा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा