![]() |
प्रथम स्मृतिदिनानिमित्त ग्रामस्थांना वृक्ष वाटप करताना रावण कुटुंबीय |
प्रा.चिदानंद अळोळी : उपसंपादक
औरवाड : येथील कै.श्री बाळासो आण्णा रावण यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त ग्रामस्थांना वेगवेगळ्या जातीच्या 200 रोपांचे वाटप करून अनोखा सामाजिक उपक्रम राबविला आहे.
वडिलांच्या प्रथम पुण्यस्मरण आयुष्यभर स्मरणात राहावे रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये उपयोगी व्हावे, तसेच वाढत्या औद्योगीकरणामुळे दिवसेंदिवस पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात तापमानात वाढ होऊन पर्यावरणाचा समतोल ढासळत आहे. त्यासाठी वृक्ष लागवड करून त्यांचे संवर्धन करणे गरजेचे आहे. पर्यावरणाचे रक्षण करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे.हे कर्तव्य लक्षात घेऊन कै.श्री.बाळासो आण्णा रावण यांची दोन्ही मुले प्रदीप रावण व संदीप रावण या भावंडानी हा सामाजिक निर्णय घेतला.
यापूर्वी या कुटुंबीयांनी महापूराची आलेली 95 हजार ची मदत ही मुख्यमंत्री सहायता निधीला दिली होती. अशा विविध कारणांनी हे कुटुंबीय नेहमी सामाजिक बांधिलकी जपत असते.या निर्णयाचे सर्व स्तरावर विशेष कौतुक होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा