![]() |
श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे गुरुपौर्णिमा निमित्त दत्त भक्तांची अलोट गर्दी |
*प्रा. चिदानंद अळोळी : उपसंपादक*
नृसिंहवाडी : दत्तभक्तांच्या अलोट गर्दीत दिगंबरा दिगंबरा... च्या अखंड नामस्मरणात व श्री गुरुदेव दत्त च्या गजरात श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे कृष्णा – पंचगंगा संगमतीर्थावर भक्तीमय वातावरणात गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात संपन्न झाली. लाखावर भाविकांच्या हजेरीने दत्तमंदिर गर्दीने फुलून गेले होते. ही गर्दी रात्री उशिरा पर्यंत होती. स्नानासाठी व गुरुपूजनासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. मुख्य मंदिर पाण्याखाली असलेने नारायण स्वामी मंदिरात ठेवण्यात आलेल्या उत्सव मूर्ती चे भाविकांनी दर्शन घेतले पूजेचे उपचार तिथेच संपन्न झाले.
आज गुरूपौर्णिमेनिमित्त श्री दत्त मंदिरात अनेक धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करणेत आले होते.पहाटे साडेचार वाजता काकडआरती व षोडशोपचार पूजा, सकाळी सात ते बारा यावेळेत अनेक भक्तांनी ‘श्री’ ना पंचामृत अभिषेक पूजा सेवा केली.दुपारी १२.३० वाजता श्रींचे उतासवमूर्ती ला महापूजा करणेत आली तीन वाजता ब्रह्मवृंदाकडून पवमान पंचसूक्तांचे पठण करणेत आले.रात्रो ९ नंतर दत्त मंदिरात धूप,दीप, आरती होवून इंदुकोटी स्तोत्र व पारंपारिक पदे म्हणणेत आली. गुरुपौर्णिमा व गुरुपूजन करणेसाठी महाराष्ट्रसह गुजरात, कर्नाटक, गोवा आदी अनेक राज्यातून असंख्य भक्तगणांनी ह्जेरी लावली..टू व्हीलर व सायकल वरून येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षणीय होती.भाविकांनी येथे येवून गुरुचरणाचे दर्शन घेवून गुरुपूजन तसेच जप, जाप्य,अनुष्ठान तसेच अनुष्ठान करून गुरूंचे आशीर्वाद घेतले.
भाविकांच्या सोयीसाठी येथील दत्त देव संस्थान मार्फत ठीकठिकाणी क्लोज सर्किट टीव्ही.व्यवस्था, दर्शन रांग, मुखदर्शन व्यवस्था, सूचना फलक, ध्वनीक्षेपक यंत्रणा,सुरक्षा रक्षक,आदी व्यवस्था करणेत आली होती. ग्रामपंचायत मार्फत पार्किंग, दिवाबत्ती आरोग्य व्यवस्था, जंतुनाशक फवारणी, साफ सफाई आदी सोयी सुविधा करणेत आल्या होत्या.मेवा मिठाई खरेदी करण्यासाठीही भाविकांनी गर्दी केली. मंदिर व परिसरात आवश्यक पोलीस बंदोबस्त होता. गुरुपोर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाल्याचे दत्त देव संस्थानचे अध्यक्ष वैभव काळूपुजारी, सचिव संजय उर्फ सोनू पुजारी सांगितले. दुचाकी, चारचाकी वाहनांची पार्किंग व्यवस्था सरपंच सौ चित्रा सुतार ,उपसरपंच रमेश मोरे, माजी सरपंच धनाजीराव जगदाळे त्यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचाऱ्यांनी चांगली केली . पोलीस यंत्रणा व वाहतूक पोलीस यांच्यासह चोख बंदोबस्त होता.
पार्किंग फुल्ल – दत्त दर्शनासाठी भाविकांनी ठीक ठिकाणाहून टूव्हीलर व खासगी चारचाकी गाड्या आणलेने पार्किंग ची जागा फूल्ल झाली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा