![]() |
माजी सरन्यायाधीश मा. उदय लळीत लळीत यांच्याकडून पुरस्कार स्वीकारताना सुकृत ताम्हनकर, सोबत सुरेश प्रभू व अन्य मान्यवर |
*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
सांगली : दि. १५ जुलै २०२४ रोजी बालगंधर्वांच्या ५७व्या स्मृतिदिनानिमित्त बालगंधर्व रंगमंदिर, पुणे येथे बालगंधर्व संगीत रसिक मंडळ, पुणे या संस्थेतर्फे दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांचे वितरण झाले. या कार्यक्रमात “कोहिनूर गंधर्व पुरस्कार” सांगलीच्या सुकृत ताम्हनकर यांना भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश मा. श्री. उदय लळीत यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला. स्मृतिचिन्ह आणि ५१ हजार रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माजी केंद्रीय रेल्वेमंत्री मा. सुरेश प्रभू, कोहिनूर ग्रुपचे संचालक श्री. कृष्णकुमार गोयल, सनदी लेखापाल श्री. विजयकांत कुलकर्णी, उद्योजक श्री. श्रीधर प्रभू उपस्थित होते. तसेच मंडळाचे अध्यक्ष श्री. सुरेश साखवळकर, कार्याध्यक्ष श्री. नाना कुलकर्णी , उपाध्यक्षा सौ. अनुराधा राजहंस आणि सचिव सौ. अवंती बायस हे देखील उपस्थित होते.
यावेळी मंडळातर्फे एकूण १३ पुरस्कारांचे वितरण झाले. बालगंधर्व गुणगौरव पुरस्कार प्रसिद्ध गायक श्री. महेश काळे यांना प्रदान करण्यात आला. पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर “गंधर्वरंग” हा नाट्यगीतांचा कार्यक्रम संपन्न झाला. यामध्ये पुरस्कारप्राप्त कलाकारांसह विदुषी मंजिरी आलेगावकर, बकुळताई पंडित, रवींद्र कुलकर्णी, सुरेश साखवळकर या ज्येष्ठ कलाकारांनी नाट्यपदे सादर केली. या संपूर्ण कार्यक्रमाला पुणेकर रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मा.सुकृत ताम्हनकर हे विलिंग्डन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भास्कर ताम्हनकर यांचे सुपुत्र असून ते या अगोदरही अनेक पुरस्काराने सन्मानित झाले आहेत. त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा