Breaking

सोमवार, १५ जुलै, २०२४

*एन.एस.एस.एक सेवारुपी उत्तम अनुभवाचा, विविध क्षेत्रात करिअर संधीसाठी उपयुक्त व मूलभूत मार्ग : विनायक कुलकर्णी यांचे प्रतिपादन*

 

राष्ट्रीय सेवा योजनेच्या उद्बोधन व्याख्यानात मार्गदर्शन करताना मा. विनायक कुलकर्णी, उपप्राचार्य प्रा.डॉ.सौ. विजयमाला चौगुले,
प्रा.डॉ. तुषार घाटगे, कार्यक्रम अधिकारी डॉ. खंडेराव खळदकर व डॉ. प्रभाकर माने

*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


जयसिंगपूर : अनेकांत एज्युकेशन सोसायटीच्या जयसिंगपूर कॉलेज,जयसिंगपूर मध्ये राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने नवीन प्रवेशित झालेल्या विद्यार्थ्यांसाठी उद्बोधन वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे सामाजिक कार्यकर्ते व प्रेरक वक्ते मा. विनायक कुलकर्णी, सांगली व अध्यक्षस्थानी उपप्राचार्य प्रा.डॉ.सौ. विजयमाला चौगुले उपस्थित होते.

       मा. विनायक कुलकर्णी एन.एस.एस. स्वयंसेवक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले, राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून राष्ट्रप्रेम, राष्ट्रचेतना व राष्ट्रीय कार्य करण्याचे एक नामी संधी उपलब्ध होते. त्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा शारीरिक, मानसिक व बौद्धिक अर्थात सर्वांगीण विकास होण्यास एक संधी उपलब्ध होते. एन.एस.एस. मधून सामाजिक  बांधिलकी, जबाबदारी व संवेदनशीलता निर्माण होऊन विद्यार्थ्यांना विविध एनजीओच्या माध्यमातून सामाजिक कार्य करता येते. स्वतः NGO स्थापन करून त्या माध्यमातून सामाजिक कार्याबरोबर उत्तम करिअर बनविता येते. राजकीय क्षेत्रात व स्पर्धा परीक्षेत करिअर करणाऱ्यासाठी एन.एस.एस. एक उत्तम अनुभवाचा उपयुक्त व मूलभूत मार्ग आहे. 

      अध्यक्ष स्थानावर बोलताना उपप्राचार्य प्रा.डॉ.सौ. विजयमाला चौगुले म्हणाल्या, संविधानाला अनुसरून एक प्रतिभावंत व सच्चा नागरिक निर्माण करण्यास एनएसएस सदासर्वकाळी उपयुक्त आहे. त्यामुळे कोणत्याही क्षेत्रात एनएसएस सेवा काळातील अनुभवाचा निश्चितच लाभ होतो.

      सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी  राष्ट्रीय सेवा योजना कक्ष, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरचे संचालक प्रा.डॉ. तानाजी चौगले व प्राचार्य डॉ. सुरत मांजरे यांची प्रेरणा, मार्गदर्शन व विशेष सहकार्य लाभले.

      या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ. प्रभाकर माने यांनी केले. कार्यक्रमाचे उत्तम सूत्रसंचालन प्रा.डॉ. राजेंद्र कोळी यांनी केले. कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ. खंडेराव खळदकर यांनी आभार मानले.

      या कार्यक्रमास IQAC समन्वयक प्रा.डॉ.तुषार घाटगे,प्रा.डॉ. सुपर्णा संसुद्धी, प्रा.सुरज चौगुले, सर्व प्राध्यापकवृंद,एन.एस. एस प्रतिनिधी रोहन लाले, व एनएसएस स्वयंसेवक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा