Breaking

गुरुवार, २६ सप्टेंबर, २०२४

*जयसिंगपूरच्या डॉ.मगदूम अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचे विद्यापीठ स्तरीय परीक्षेत घवघवीत यश*


यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करताना डॉ.विजयराज मगदूम
,प्राचार्य डॉ. गोपाळ मुलगुंद व अन्य मान्यवर 


प्रा. बाळगोंडा पाटील : उपसंपादक*


    जयसिंगपूर :  शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर आयोजित बी. टेक (सी.बी. सी. एस.) परीक्षेत डॉ.जे.जे मगदूम अभियांत्रिकी महाविद्यालय जयसिंगपूर येथील माहिती तंत्रज्ञान विभागातील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले.प्रथम वर्षातील कु. प्रज्वल रतनकुमार करजंगे या विद्यार्थिनींनी यशवंतराव पांडुरंगराव  पवार पारीतोषिक व अंतिम वर्षातील विद्यार्थीनी कु.वैष्णवी विश्वास लाड हिने उद्योगभूषण शिवाजीराव देसाई पारीतोषिक पटकाविले.

        शिवाजी विद्यापीठाकडून इंजिनिअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्यासाठी ही परीक्षा आयोजित करण्यात आली होती. बी. टेक. सी.बी.सी.एस.पॅटर्न वरती आधारित आयोजित परीक्षेत एक विशेष महत्त्व आहे.

         यशस्वी विद्यार्थिनींचा सत्कार ट्रस्टचे चेअरमन डॉ. विजयराज मगदूम व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गोपाळ मुलगुंद यांच्या हस्ते करण्यात आला या सत्कार प्रसंगी विभाग प्रमुख प्रा. राजेश भारतीय,सौ. प्रणोती  तामगावे,सौं. सीमा बंडगर उपस्थित होत्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा