Breaking

बुधवार, २५ सप्टेंबर, २०२४

*जयसिंगपूर कॉलेजमध्ये एन.एस. एस. डे विधायक कामाच्या माध्यमातून संपन्न*


एन एस.एस.डे निमित्त विविध उपक्रम


*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


जयसिंगपूर : जयसिंगपूर कॉलेज जयसिंगपूर मध्ये मंगळवार दिनांक २४ सप्टेंबर २०२४ रोजी  कॉलेज कॅम्पस मध्ये विधायक कामाच्या माध्यमातून एन.एस.एस.डे साजरा करण्यात आला.

     प्रारंभी जयसिंगपूर नगरपालिकेच्या वतीने अधिकारी अनिरुद्ध महाजन यांनी सर्व स्वयंसेवक विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. माझी वसुंधरा अभियानाबाबत प्रबोधन केले. यावेळी विद्यार्थ्यांना स्वच्छतेबाबत जागृत करण्यासाठी 'स्वच्छता प्रतिज्ञा ग्रहण' कार्यक्रम संपन्न झाला. याप्रसंगी प्राचार्य डॉ. सुरत मांजरे यांनी सर्व एन.एस.एस. स्वयंसेवक विद्यार्थ्यांना एन.एस.एस डे निमित्त यथोचित मार्गदर्शन केले. याप्रसंगी प्रा.बी.ए.पाटील उपस्थित होते.

     राष्ट्रीय सेवा योजना कक्षाचे संचालक डॉ. टी.एम. चौगले व प्राचार्य डॉ. सुरत मांजरे यांच्या मार्गदर्शनानुसार एनएसएस डे निमित्त कॉलेजचा कॅम्पस स्वच्छ करून प्लास्टिक मुक्त करण्यात आला. त्याचबरोबर महाराष्ट्र शासन व राजू शेट्टी सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या रोजगार मेळाव्यास राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी विविध सेवेच्या माध्यमातून सहकार्य केले. याबाबत खासदार राजू शेट्टी यांनी अभिनंदन केले. 

     या कार्यक्रमास कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रभाकर माने, डॉ.के. डी. खळदकर, एन.एस.एस.प्रतिनिधी रोहन लाले व अन्य स्वयंसेवक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा