![]() |
धनंजय महाडिक युवा शक्ती संचलित मोरया युथ फाऊंडेशन, जयसिंगपूर |
*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
जयसिंगपूर : येथील राजीव गांधी नगर मधील मोरया मंडळाच्या वतीने समाजोपयोगी, सांस्कृतिक व रचनात्मक सामाजिक कार्याच्या माध्यमातून गणेशोत्सव साजरा होत आहे.
मोरया मंडळाचे मार्गदर्शक व आधारस्तंभ जोतीराम जाधव यांच्या नेतृत्वाखाली या मंडळांने अत्यंत सुंदर व देखणा शामियाना उभा केला आहे. जयसिंगपूर शहरातील अत्यंत आकर्षक व मनाला भावणारी सुंदर कलाकृतीचे दर्शन होत असून या ठिकाणी भाविकांची प्रचंड गर्दी होत आहे. या मंडळाने गेल्या २४ वर्षापासून सामाजिक बांधिलकी जपत रचनात्मक कामाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले आहेत. प्रारंभी आध्यात्मिक भावना वृद्धीगत करण्यासाठी भजन कार्यक्रमाचे आयोजन, हळदी कुंकू कार्यक्रम, स्त्रियासाठी कॅन्सर या विषयावर जनजागृती व्याख्यान, महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी संगीत खुर्ची, रांगोळी स्पर्धा व अन्य स्पर्धेचे आयोजन केले जात आहे.
जयसिंगपूर धनंजय महाडिक युवाशक्ती संचलित मोरया युथ फाऊंडेशनचे अध्यक्ष सागर काशीद, उपाध्यक्ष विवेक जाधव, सेक्रेटरी गणेश निंगनुरे, सहसचिव महेश माळगे, खजिनदार किरण कोळी व अन्य सदस्य यांचे सहकार्य लाभले आहे.या मंडळाचे राहुल पाटील, हेमंत कदम, संतोष कट्टीगिरी, संजय पाटील जांभळीकर, शीतल पाटील, प्रशांत ढेंगळे यांचे मार्गदर्शन व सहकार्य मिळाले आहे. तसेच जयसिंगपुरातील ख्यातनाम उद्योजक , सामाजिक कार्यकर्ते व धनंजय महाडिक युवाशक्तीचे आधारस्तंभ जोतीराम जाधव यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.
दरवर्षीप्रमाणे हिंदी कलाकारांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी शिरोळ तालुका मर्यादित हिंदी व मराठी कराओके स्पर्धा - विजेत्या स्पर्धकास प्रथम पुरस्कार ३००१, द्वितीय पुरस्कार २००१ व तृतीय पुरस्कार १००१
भव्य रेकॉर्ड डान्स स्पर्धा प्रथम बक्षीस ६०००, द्वितीय बक्षीस ४०००, तृतीय बक्षीस २००० व चतुर्थ बक्षीस ₹ १००० प्रदान केले जाणार आहे. तरी संबंधित घटकांनी या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन जोतीराम जाधव यांनी केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा