![]() |
प्रा. आप्पासाहेब भगाटे, विद्यमान व्हा. चेअरमन |
*प्रा.डॉ.प्रभाकर माने : मुख्य संपादक*
जयसिंगपूर : येथील कर्मवीर भाऊराव पाटील मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या संचालक मंडळ सभेत संस्थेच्या व्हाईस चेअरमनपदी प्रा.आप्पासाहेब भगाटे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
प्रा.आप्पासाहेब भगाटे हे नांदणी गावचे सुपुत्र असून त्यांनी या क्रेडिट सोसायटीच्या माध्यमातून सोसायटी व सभासदांच्या कल्याणार्थ उत्तम सेवा बजावली आहे. अत्यंत दक्ष व दूरदृष्टी असलेला कार्यशील संचालक म्हणून ते परिचयाचे आहेत. सभासदांच्या उन्नतीसाठी ते सदैव तत्पर असतात.
प्रा.भगाटे यांनी अनेकांत एज्युकेशन सोसायटी बारामतीच्या तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात भूगोल विषयाचे ख्यातनाम प्राध्यापक म्हणून त्यांनी आपली सेवा बजावली. विद्यार्थी प्रिय, कडक शिस्त व वेळेचे काटेकोरपणे पालन करणारे प्राध्यापक आहेत. त्यांची शैक्षणिक क्षेत्रातील सेवा व अनुभव अत्यंत उत्तम असून याचा लाभ संस्थेला व विद्यार्थ्यांना व्हावा या हेतूने जयसिंगपूर कॉलेज, जयसिंगपूर स्थानिक व्यवस्थापन समितीच्या सदस्य पदी त्याची निवड झाली. या पदाचा योग्य वापर करीत त्यांनी अल्पावधीतच संस्थेचे चेअरमन डॉ. सुभाष अडदंडे यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी कॉलेज व अनेकांत इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेजचा शैक्षणिक, सांस्कृतिक व भौतिक गुणवत्ता वृद्धिगत करण्याचा प्रयत्न केला. प्रचंड अनुभव,उत्तम वाणी, भाषेवर असलेले प्रभुत्व,कामावर व संत मुनीच्यावर असलेली अटळ श्रद्धा या त्यांच्या गुणवैशिष्ट्यामुळे त्यांनी सर्व घटकांना आपलंसे केले आहे.प्रा. भगाटे यांनी आपल्या कामाच्या माध्यमातून शैक्षणिक, वित्तीय क्षेत्र, सामाजिक, सांस्कृतिक, कला व क्रीडा व धार्मिक क्षेत्रात नेत्रदीपक कामगिरी केली आहे. क्रीडा क्षेत्रातील उच्च पदावर त्यांनी काम करून क्रीडाक्षेत्र सक्षम करण्याचा प्रयत्न केला.प्रा.भगाटे हे सामाजिक संवेदनशील असून त्यांनी अनेक चळवळीच्या विशेष करून शेतकरी संघटनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी त्यांनी आपलं कार्य व्यतित केले. सर्व धार्मिक कार्यक्रमाच्या माध्यमातून माणुसकी जपण्याचं काम त्यांनी केलेले आहे. सन २००५,२०१९ व २०२१ या महापुराच्या बिकटप्रसंगी व कोरोना महामारीच्या काळात त्यांनी बजावलेली सेवा विश्वसनीय आहे.
कोणत्याही कार्याचं दिलेलं शिवधनुष्य ते सहजपणे पेलून निश्चित केलेला उद्दिष्टापर्यंत ते पोहोचतात ही त्यांची एक वेगळी हातोटी आहे. समाजातील प्रत्येक घटकांचा मान सन्मान राखीत भगवान महावीरांच्या कृतिशील विचारांचे सत्य, हिंसा, प्रेम व परस्परग्रहो जीवानंम या तत्त्वांशी एकनिष्ठ राहून त्यांनी आपल्या खाजगी आयुष्यात ही त्याचे तंतोतंत पालन केले आहे. त्यांच्या या शैक्षणिक वाटचालीत संस्थेचे सचिव डॉ. महावीर अक्कोळे, पद्माकर पाटील व संस्थेचे पदाधिकारी,प्राचार्य डॉ.सुरत मांजरे,अनेकांत परिवार, जयसिंगपूर कॉलेज, जयसिंगपूर व जय हिंद न्यूज नेटवर्क परिवाराच्या वतीने अशा या बहुश्रुत व्यक्तिमत्वाला अर्थात आदर्शवत प्रा. आप्पासाहेब भगाटे यांचे हार्दिक अभिनंदन व पुढील कार्यास खूप खूप शुभेच्छा
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा