![]() |
गणेश विसर्जनासाठी पर्यावरणपूरक कृत्रिम जल व निर्माल्य कुंड |
*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
जयसिंगपूर : दरवर्षीप्रमाणे या वर्षी ही जयसिंगपूर नगरपरिषदेच्या वतीने घरगुती गणेश विसर्जनासाठी कृत्रिम जल व निर्माल्य कुंडाच्या माध्यमातून पर्यावरण पूरक उपक्रम मा.मुख्याधिकारी टीना गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला आहे.
देशात पर्यावरण पूरक गणेश विसर्जनासाठी इको-फ्रेंडली अर्थात जल व निर्माल्य कुंडाची लोकप्रियता वाढत आहे.संपूर्ण देशात दरवर्षी साजरी होणारी गणेश चतुर्थी हा एक महत्वपूर्ण सण आहे. मात्र, मूर्तींच्या विसर्जनामुळे जलप्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर आहे. यासाठी पर्यावरण पूरक गणेश विसर्जन हा एक पर्याय लोकप्रिय होत आहे. प्लास्टर ऑफ पॅरिस (POP) मूर्तींमुळे नदी, तलाव व विहिरीचे जलस्रोत प्रदूषित होत यासाठी म्हणून माझी वसुंधरा अभियानांतर्गत नगरपालिकेच्या वतीने गणेश विसर्जनासाठी जलकुंड व निर्माल्य कुंडाची व्यवस्था केली आहे.
जयसिंगपूर नगरपालिकेच्या माध्यमातून पर्यावरणाचा जागर, पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी तसेच नागरिकांमध्ये सजगता वाढविणे आवश्यक आहे म्हणून या हेतूने गणेश विसर्जनासाठी कृत्रिम जलकुंड व निर्माल्य कुंड विविध ठिकाणी निर्माण केले आहेत. नगरपालिकेच्या या पर्यावरण पूरक कृत्याने पर्यावरण समतोलातील एक महत्त्वाचा व मैलाचा टप्पा बनत आहे.
यासाठी नगरपालिकेचे अधिकारी अनिरुद्ध महाजन, संदीप कांबळे,कर्मचारी रोहित कट्टीमनी व नगरपालिकेच्या इतर सर्व घटकांचे सहकार्य लाभले आहे.
जयसिंगपूर नगरपालिकेच्या या पर्यावरण पूरक उपक्रमाचे कौतुक जयसिंगपूरातील पर्यावरणवादी घटक व गणेश भक्तांकडून होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा