Breaking

शनिवार, १४ सप्टेंबर, २०२४

*जयसिंगपूरच्या डॉ.जे.जे. मगदूम अभियांत्रिकी मध्ये प्रथम वर्ष विद्यार्थ्यांचे स्वागत : पात्र विद्यार्थ्यांना विशेष स्कॉलरशिप प्रदान*

 

विद्यार्थी-पालक स्वागत व सत्कार कार्यक्रम संपन्न


*प्रा. बाळगोंडा पाटील : उपसंपादक*        


    जयसिंगपूर : येथील डॉ. जे. जे. मगदूम कॉलेज ऑफ इंजीनियरिंग मध्ये प्रथम वर्ष अभियांत्रिकी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थी व पालक यांचा स्वागत व सत्कार समारंभ संपन्न झाला.

      कार्यक्रमाची सुरुवात ट्रस्टचे  दिवंगत चेअरमन कै.डॉ.जे. जे.मगदूम व कै. प्रभा जे. मगदूम यांच्या प्रतिमेस वंदन करून करण्यात आली. प्रथम वर्ष विभाग प्रमुख डॉ. एम. बी. भिलवडे यांनी प्रास्ताविकात उपस्थितांचे स्वागत करून कार्यक्रमाचा हेतू विशद केला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गोपाळ मुलुगुंद होते.

         अभियांत्रिकी महाविद्यालयाची स्थापना १९९२ ची असून गेल्या ३२ वर्षांमध्ये शिक्षण घेतलेले अनेक यशस्वी विद्यार्थी देशात व परदेशात नोकरी करत आहेत. महाविद्यालयीन प्लेसमेंट, विद्यापीठातील रँकर, परदेशात स्कॉलरशिप मिळवून शिक्षण घेत असलेले विद्यार्थी याचा आढावा घेऊन २०२४ मध्ये प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या साठी महाविद्यालयाकडून जाहीर केलेल्या डॉ. प्रभा जे. मगदूम स्कॉलरशिपची माहिती प्राचार्यानी  दिली व फी मध्ये दिलेल्या सवलतीचा लाभ घेऊन विद्यार्थ्यांनी आपले करिअर करावे अशा शुभेच्छा दिल्या. 

        ट्रस्टचे चेअरमन डॉ. विजयराज मगदूम व व्हॉइस चेअरपर्सन डॉ.सोनाली मगदूम यांनी प्रवेश प्राप्त विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. चांगल्या प्लेसमेंट सोबत चांगले इन्फ्रास्ट्रक्चर देण्यामध्ये व्यवस्थापन कोणत्याही प्रकारची कुचराई करणार नाही तसेच वेगवेगळ्या कंपन्यांशी  सामंजस्य करार करून चांगल्या नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातील. विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घ्यावा असे त्यांनी नमूद केले. याप्रसंगी कॅम्पस डायरेक्टर डॉ. सुनील आडमुठे उपस्थित होते.

         या कार्यक्रमासाठी विद्यार्थी पालक सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रम पार पाडण्यासाठी प्रथम वर्ष अभियांत्रिकी विभागाने विशेष परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा