![]() |
अंशुल नीलकंठचा सत्कार करताना डॉ. विजयराज मगदूम, प्राचार्य. डॉ.मुंदगुल व अन्य मान्यवर |
*प्रा.डॉ.महावीर बुरसे : उपसंपादक*
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठ अंतर्गत कोल्हापूर विभागीय झोनल बुद्धिबळ स्पर्धेत डॉ.जे.जे.मगदूम कॉलेज ऑफ इंजीनियरिंग च्या विद्यार्थ्यांनी द्वितीय क्रमांक पटकाविला.महाविद्यालयाच्या इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी विभागातील अंशुल नीलकंठ या विद्यार्थ्यांची इंटर झोनल करिता निवड करण्यात आली असल्याची माहिती स्पोर्ट्स विभाग प्रमुख प्रा.नवनाथ पुजारी यांनी दिली.
शिवाजी विद्यापीठ अंतर्गत आयोजित बुद्धिबळ स्पर्धेमध्ये अंशुल नीलकंठ सोबत,श्रीहरी चिखलकर,श्रेयश गायकवाड,रोहन सूतार व जोसेफ लालमिंगमोआ या खेळाडूंनी सहभाग घेतला होता.
डॉ. जे. जे. मगदूम ट्रस्टचे चेअरमन डॉ. विजयराज मगदूम, व्हाईस चेअरपर्सन डॉ. सोनाली मगदूम , कॅम्पस डायरेक्टर डॉ. एस .एस.आडमुठे,प्राचार्य डॉ.जी.व्ही.मुलगुंद यांनी विजयी संघाचे अभिनंदन केले व अंशुल नीलकंठला भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
प्रा. पी. पी. पाटील, अधिष्ठाता-विद्यार्थी कल्याण, शारीरिक शिक्षण संचालक प्रा. एन. के. पुजारी व स्पोर्ट्स कमिटी या सर्वांचे बहुमुल्य सहकार्य विद्यार्थ्यांना लाभले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा