Breaking

मंगळवार, १ ऑक्टोबर, २०२४

*राष्ट्रीय सेवा योजना ही देशप्रेम,राष्ट्रसेवा व राष्ट्रविकासाची गुरुकिल्ली : प्रा.डॉ. प्रभाकर माने यांची प्रतिपादन*

 

एन.एस.एस.दिनानिमित्त मार्गदर्शन करताना डॉ. प्रभाकर माने, अध्यक्षस्थानी डॉ. मोहन सावंत व डॉ. अमोल महाजन


*प्रा.डॉ. महावीर बुरसे : उपसंपादक*


हातकणंगले : राष्ट्रीय सेवा योजना ही युवकांना देशाच्या विकास प्रक्रियेत सक्रियपणे सहभागी होण्याची प्रेरणा देते.ही योजना युवकांच्या माध्यमातून राष्ट्रसेवा, राष्ट्रप्रेम व विकासाची गुरुकिल्ली म्हणून ओळखली जात असल्याचे मत जयसिंगपूर कॉलेजचे प्रा.डॉ. प्रभाकर माने यांनी डॉ. अण्णासाहेब डांगे महाविद्यालय येथे संपन्न झालेल्या राष्ट्रीय सेवा योजना दिना निमित्त व्यक्त केले. अध्यक्षस्थानी डॉ. मोहन सावंत व कार्यक्रम अधिकारी डॉ. अमोल महाजन उपस्थित होते.

     डॉ.माने म्हणाले, एन एस एस म्हणजे विद्यार्थ्यांना शैक्षणिक ज्ञानाच्या पलीकडे जात समाजाच्या गरजा ओळखणे व त्यांना सेवाभावी वृत्तीने कार्य करण्यास प्रवृत्त करणे हे आहे. महात्मा गांधीजींचे राष्ट्रप्रेम व सेवाभाव स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी आत्मसात करून कृतिशील कार्य करीत रहावे.स्वामी विवेकानंद हे राष्ट्रीय सेवा योजनेचे आयडॉल आहेत.युवकांना आपलं जीवन समाजाच्या, देशाच्या आणि अखंड मानवतेच्या सेवेसाठी समर्पित केले पाहिजे असा त्यांचा उत्तम संदेश लाखो एन.एस.एस.च्या विद्यार्थ्यांना प्रेरणा देतो.

  अध्यक्ष स्थानावर बोलताना डॉ. मोहन सावंत म्हणाले, बलशाही भारताच्या निर्मितीसाठी एन एस एस स्वयंसेवक विद्यार्थी हे सामाजिक सेवा व राष्ट्रवादी विचाराने प्रभावीत झाले पाहिजेत. स्वप्नातील भारत प्रत्यक्षात उतरविण्यासाठी खरी मेहनत घेतली पाहिजे.

       नांदेड येथे नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय प्रजासत्ताक दिनाच्या प्रशिक्षण निवड शिबिरात सहभागी झालेल्या कु.भक्ती कांबळे व कु. भाग्यश्री सुतार व जयसिंगपूर कॉलेजचा विद्यार्थी वीरेंद्र कडाळे यांचा याप्रसंगी विशेष सत्कार करण्यात आला. 

     या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी डॉ.अमोल महाजन व पाहुण्यांचा परिचय प्रा.सचिन कांबळे यांनी केला. कु.साक्षी चौगुले  हिने आभार मानले व उत्तम सूत्रसंचालन कु. सुकन्या कांबळे यांनी केले. या कार्यक्रमास शिवाजी विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना कक्षाचे संचालक डॉ. टी.एम.चौगले व प्राचार्य डॉ. निरंजन कुलकर्णी यांचे विशेष मार्गदर्शन व मौलिक सहकार्य लाभले.कु.अमन आवळे व कु.मनोज पोवार या दोन स्वयंसेवकांचे विशेष सहकार्य लाभले.

  या कार्यक्रमास महाविद्यालयातील डॉ.वंदना खरात प्रा.डॉ.एकनाथ पाटील,प्रा.डॉ.नामदेव खवरे,प्रा. डॉ.विकास विधाते,प्रा.डॉ. अमर कांबळे , प्रा.डॉ. आप्पासाहेब शेळके, प्रा.सूर्यवंशी सर,डॉ. विजय डोंगरे,प्राध्यापकवृंद, प्रशासकीय कर्मचारी व सेवक,राष्ट्रीय सेवा योजनेचे असंख्य विद्यार्थी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा