![]() |
डॉ.जे.जे. मगदूम कॉलेज ऑफ इंजीनियरिंग, जयसिंगपूर व प्राचार्य, प्राध्यापक व निवड झालेली विद्यार्थी |
*प्रा. बाळगोंडा पाटील : उपसंपादक*
जयसिंगपूर : येथील डॉ. जे. जे. मगदूम कॉलेज ऑफ इंजीनियरिंगच्या १२ विद्यार्थ्यांची एक्सलर एज्युटेक प्रा. लि. या नामांकित आय.टी. सेवा पुरवणाऱ्या कंपनीत निवड झाली आहे अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गोपाळ मुलुगुंद यांनी दिली.
निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये कॉम्प्युटर सायन्स विभागाच्या आकांक्षा गायकवाड, आर्यन पाटील, तुषार गिड्डे, दिग्विजय देसाई, ऋतुजा आवळे, प्रज्वल गस्ते,शितल गावडे,प्रणव साळुंखे,आर्यन चौगुले, अब्दुल फैज शेख या १० विद्यार्थ्यांचा समावेश आहे. आय.टी. विभागातून साक्षी कोळेकर व एम.सी.ए. विभागाची हर्षदा नांदणीकर याही विद्यार्थ्यांची निवड नोकरीसाठी झाली आहे.
डॉ.जे. जे. मगदूम ट्रस्टचे चेअरमन डॉ. विजयराज मगदूम, व्हाईस चेअरपर्सन ॲड.डॉ.सोनाली मगदूम, कॅम्पस डायरेक्टर डॉ.सुनील आडमुठे यांनी नोकरीसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.
महाविद्यालयाचे प्लेसमेंट ऑफिसर प्रा. पी.पी. माळगे, विभाग प्रमुख डॉ. अर्चना चौगुले, प्रा. राजेश भारतीय, प्रा.प्रवीण कोठावळे, प्लेसमेंट समन्वयक प्रा.रोहित माने, प्रा. एस. बंडगर प्रा.श्वेजल वाडकर, डॉ. अनिरुद्ध मोरे यांचे सहकार्य लाभले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा