Breaking

मंगळवार, ५ नोव्हेंबर, २०२४

सत्ता आल्यावर मुलींप्रमाणे मुलांनाही मोफत शिक्षण सुरु करणार. जीवनावश्यक वस्तूंचे दर स्थिर ठेवणार - मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी महाविकास आघाडीची सत्ता आल्यावर पाच जीवनावश्यक वस्तूंचे दर कोणत्याही परिस्थितीत स्थिर ठेवणार तसेच मुलींप्रमाणे मुलांनाही मोफत शिक्षण सुरु करणार, असे आश्वासन जनतेला दिले.


 कोल्हापूर जिल्ह्यातील आदमापूर येथे महाविकास आघाडीचे उमेदवार के.पी. पाटील यांच्या प्रचारसभेत ते बोलत होते.  

     महायुतीच्या काळात गंभीर बनलेल्या महिलांच्या सुरक्षेसाठी स्वतंत्र महिला पोलीस स्टेशनबरोबरच मोठ्या प्रमाणावर महिला पोलीसांची भरती आणि राज्यातील भूमीपुत्रांना हक्काची घरे देणार असल्याचेही उद्धवजी ठाकरे यांनी सांगितले. 

     या सभेस आदरणीय खासदार शाहू छत्रपती महाराज, महाविकास आघाडीचे उमेदवार के.पी. पाटील यांच्यासह कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा