Breaking

शनिवार, २८ डिसेंबर, २०२४

*यशाचा गौरव आणि उत्कृष्टतेचा वार्षिक उत्सव : गटशिक्षणाधिकारी मा. भारती कोळी यांचे प्रतिपादन*

 

वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात मार्गदर्शन करताना प्रमुख पाहुणे गटशिक्षणाधिकारी भारती कोळी, डॉ. अनिरुद्ध वरेकर, अध्यक्षस्थानी नितीन वाडीकर व पालक प्रा.डॉ. प्रभाकर माने


*वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा व स्नेहसंमेलन थाटामाटात संपन्न* 


जयसिंगपूर :  यशाचा गौरव, उत्कृष्ट्येचा वार्षिक उत्सव असून स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देऊन सांस्कृतिक सादरीकरणाच्या द्वारे उत्तम कलाविष्कार सादर केला जात असल्याचे मत कै.श्री. रामकृष्ण मालू प्राथमिक विद्यामंदिर व श्रीमती यशोदा शिशु मंदिर, जयसिंगपूर यांचे संयुक्त वार्षिक पारितोषिक वितरण व स्नेहसंमेलन समारंभात मुख्य अतिथी म्हणून गटशिक्षणाधिकारी मा. भारती कोळी यांनी व्यक्त केले.वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा अत्यंत थाटामाटात गुरुवार दिनांक २६/१२/२०२४ रोजी जयसिंगपूर येथे पार पडला. या प्रसंगी प्रमुख पाहुणे प्रसिद्ध धन्वंतरी, डॉ. अनिरुद्ध वरेकर व अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष नितीन वाडीकर व शाळेचे मुख्याध्यापक मा. सुनील कोळी उपस्थित होते.

       गटशिक्षणाधिकारी मा. कोळी यांनी संस्थेच्या विविध शाखेच्या शैक्षणिक व भौतिक कामगिरीबद्दल कौतुक करून विद्यार्थी व पालकांनी  मोबाईल पासून दूर राहण्यासंदर्भात आवाहन केले. प्रमुख पाहुणे डॉ. अनिरुद्ध वरेकर यांनी विद्यार्थी व पालकांचे सर्वकष विकास व आरोग्यविषयक महत्त्वाच्या बाबीवर भाष्य केले. अध्यक्ष स्थानावरून बोलताना मा. नितीन वाडीकर म्हणाले,विद्यार्थ्यांनी आपलं जीवन यशस्वी करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहवे. याप्रसंगी त्यांनी विद्यार्थी केंद्रित योजनेचा आराखडा सादर केला.पालकांच्या वतीने जयसिंगपूर कॉलेजचे प्रा.डॉ.प्रभाकर माने यांनी शाळेच्या शैक्षणिक गुणवत्ता व कामकाजाबद्दल समाधान व्यक्त केले.


  कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने आणि सरस्वती वंदनेने झाली.यावेळी शैक्षणिक, क्रीडा, सांस्कृतिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांनी विविध कलाविष्कार सादर करीत उपस्थितांची मने जिंकली. 

   कार्यक्रमासाठी लक्ष्मीनारायण मालु हायस्कूलचे चेअरमन मा.श्री.राजेंद्र मालूसाहेब,स्कूल कमिटी सदस्य मा.आनंदकिशोर मालू,मा.चंद्रकांत जाधव, मा.प्रसन्ना कुंभोजकर तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष व सर्व सदस्य उपस्थित होते. प्रथमत प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सरस्वतीपूजन,दीपप्रज्वल व स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

     तसेच शुक्रवार दि.27-12- 2024 रोजी दुपार सत्रात विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम संपन्न झाला.या कार्यक्रमाची सुरुवात रोटरी क्लब ग्रीन सिटी चे माजी अध्यक्ष मा.श्री.सुदर्शन कदम, रोटरी क्लब ट्रेड सिटीचे अध्यक्ष मा.श्री.राकेश पारिक यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आली. कार्यक्रमासाठी जयसिंगपूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मा.श्री.सत्यवान हाके यांनी मार्गदर्शन केले.

   हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी मुख्याध्यापक सुनील कोळी,सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्गाने परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. पोवार व सौ.अनिता कोळी, श्रीमती पाटील व सौ.साळुंखे मॅडम यांनी केले. पाहुण्यांचा परिचय ओंकार देवाळे पाटील व आभार श्री. शिंदे सरांनी मानले.कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने पालक वर्ग उपस्थित होता. 

   समस्त पालक वर्गातून या कार्यक्रमाबाबत समाधान व कौतुक व्यक्त करण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा