Breaking

सोमवार, ३० डिसेंबर, २०२४

*डॉ.जे.जे.मगदूम यांच्या जयंतीनिमित्त औषध उपचार, रोगनिदान शिबिर व सामाजिक उपक्रमाचे आयोजन*


प्रसिद्ध धन्वंतरी कालवश डॉ.जे.जे.मगदूम जयंती 

*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


  जयसिंगपूर : येथील डॉ. जे. जे. मगदूम ट्रस्ट संचलित शैक्षणिक संस्था व हॉस्पिटल यांच्या कडून औषधोपचार, रोगनिदान शिबिर व सामाजिक उपक्रमाचे आयोजन केले आहे अशी माहिती कॅम्पस डायरेक्टर डॉ. सुनील आडमुठे यांनी दिली.

        डॉ. जे. जे.मगदूम होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजच्या वतीने ३१ डिसेंबर २०२४ ला मोदी हॉस्पिटल येथे स ९ ते दु. ४ वा. पर्यंत मोफत तपासणी ,होमिओपॅथिक औषध उपचार,सवलतीच्या दरात शस्त्रक्रिया,ऑपरेशन, मधुमेह, थायरॉईड, निद्रानाश, टॉन्सिल्स, अर्धशिशी, हृदयरोग, ॲनिमिया निदान व उपचार, पोटाचे व आतड्याचे विकार, छातीचे व श्वसनाचे  आजार, त्वचेचे आजार तसेच शस्त्रक्रिया विभागातून कान, नाक,घसा, डोळ्याचे विकार हाडाचे व स्नायूचे विकार, अल्प दरात थायरॉड तपासणी, नेत्र तपासणी, नेत्र शस्त्रक्रिया, चष्मा, स्त्रियांचे विविध रोग व विकार, लहान मुलांचे आजार यासह जुनाट, असाध्य रोगावरती तज्ञ डॉक्टरांच्या मार्फत उपचार केले जाणार आहेत.खर्चिक शस्त्रक्रिया व उपचार हे महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना, आयुष्यमान भारत, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, मुख्यमंत्री सहाय्यता निधी माध्यमातून सर्व शासकीय सुविधांचा सेवेचा नियमावलीनुसार पेशंटला फायदा घेता येणार आहे.

      तसेच आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजच्या वतीने ३१ डिसेंबर २४ ते २ जानेवारी २५ पर्यंत आरोग्य शिबीर आयोजित केले आहे त्यामध्ये माफक दरात सर्जरी, विविध स्त्रीरोग निदान व उपचार, पंचकर्म, काय चिकित्सा उपचार, ईसीजी, दुर्बिणीद्वारे लॅप्रोस्कोपीक सर्जरीचेहि नियोजन आहे.

     विविध संस्थांच्या माध्यमातून सर्व संस्थांमध्ये सकाळी प्रतिमा पूजन तदनंतर रक्तदान शिबिर, वृक्ष लागवड, अनाथ मुलांना फळ वाटप असे सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहेत.तथापि हे सर्व सामाजिक व वैद्यकीय उपक्रम चिरंतर चालू राहतील असे मत ट्रस्टचे चेअरमन डॉ. विजयराज मगदूम व व्हॉइस चेअर पर्सन डॉ. सोनाली मगदूम यांनी व्यक्त केले. नागरिकांनी सर्व सोयी सुविधांचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले आहे.

   शिबिराचे आयोजन प्राचार्य डॉ. सुनील बन्ने, डॉ. बुद्रुक यांच्या मार्गदर्शनाखाली उप प्राचार्या डॉ. आरती कोगनोळे, डॉ.गजाला सय्यद, डॉ. संजय पाखंडी,ॲडमिनिस्ट्रेटर डॉ.तिवडे, सहकारी डॉक्टर्स,प्राध्यापक, प्रशासकीय सेवक व कर्मचारी यांच्या सहकार्याने करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा