Breaking

शनिवार, २१ डिसेंबर, २०२४

भारतीय संविधान : सक्षम लोकशाहीचा व चौफेर विकासाचा पाया : डॉ. महावीर अक्कोळे यांचे प्रतिपादन*

 

मार्गदर्शन करताना डॉ. महावीर अक्कोळे व अध्यक्षस्थानी उपप्राचार्य डॉ.सौ. विजयमाला चौगुले, डॉ. बी.एम.सरगर उपप्राचार्य डॉ. भारत आलदर व डॉ. महावीर बुरसे 


*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


जयसिंगपूर : भारतीय संविधान अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त जयसिंगपूर कॉलेजच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये संविधान सप्ताहतंर्गत पोस्टर सादरीकरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी उद्घाटक म्हणून प्रसिद्ध धन्वंतरी व संस्थेचे सचिव डॉ. महावीर अक्कोळे व अध्यक्षस्थानी प्रा.डॉ.सौ. विजयमाला चौगुले उपस्थित होत्या.या निमित्ताने पारितोषिक वितरण कार्यक्रम संपन्न झाला.

      कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व वक्ते डॉ. महावीर अक्कोळे म्हणाले, अमृत महोत्सवाच्या निमित्ताने, नागरिकांनी संविधानाची प्रत घरी आणून त्याचे वाचन करणे, तसेच 'घर घर संविधान' अभियानात सहभागी होणे आवश्यक आहे. यामुळे संविधानिक हक्क आणि कर्तव्यांची जाणीव वाढेल आणि लोकशाही मूल्यांची अधिक दृढता होईल. संविधानाच्या अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विविध शैक्षणिक संस्थांमध्ये व्याख्याने, चर्चासत्रे आणि कार्यशाळांचे आयोजन केले गेले पाहिजे.यामुळे संविधानाबद्दलची माहिती आणि त्याचे महत्त्व नवीन पिढीपर्यंत पोहोचेल. या महोत्सवाच्या निमित्ताने, नागरिकांनी संविधानाच्या मूल्यांची जाणीव ठेवून स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या मूल्यांची जाणीव वाढवणे आहे. देशाच्या प्रगतीसाठी योगदान देणे आवश्यक आहे. 

     अध्यक्ष स्थानावरून बोलताना उपप्राचार्य डॉ. विजयमाला चौगुले म्हणाल्या, आपलं अस्तित्व व आपलं भविष्य या संविधाना मुळे अबाधित राहणार आहे.या संविधानाच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने, आपण सर्वांनी संविधानाच्या मूल्यांची जपणूक करण्याचा संकल्प करूया.

    प्राचार्य डॉ. सुरत मांजरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम संपन्न झाला. प्रमुख उपस्थितीमध्ये प्रा.डॉ. बाळासाहेब सरगर, उपप्राचार्य प्रा. भारत आलदर, पर्यवेक्षक व डॉ. महावीर बुरसे  हे मान्यवर उपस्थित होते.

    कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी डॉ. खंडेराव खळदकर यांनी केले. आभार कार्यक्रम अधिकारी प्रा. मुकुंद पारिशवाड यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. प्रभाकर यांनी केले. 

     या कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापकवृंद, प्रशासकीय सेवक- कर्मचारी व राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा