![]() |
श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे श्री दत्त जयंती उत्साहात साजरी |
*प्रा.चिदानंद अळोळी : उपसंपादक*
श्री दत्त प्रभूची राजधानी श्री क्षेत्र नृसिंहवाडी : येथे शनिवार दि 14/12/2024 रोजी उत्साहात श्री दत्त जन्मोत्सव उत्सव सायंकाळी 5 वाजता उत्साहात संपन्न झाला.चांदीच्या पाळण्याला आकर्षक सजावट करण्यात आली होती जन्मकाळ सोहळ्यासाठी चांदीचा पाळणा विविध रंगाच्या फुलांनी आकर्षक सजविला होता. उपस्थित असंख्य भाविकांनी सजविलेल्या पाळण्यावर अबिर, गुलाल व फुलांची मुक्तहस्ताने उधळण केली.
भगवान श्री दत्तात्रेय याची राजधानी म्हणून संपूर्ण देशभरात ओळख असलेल्या वाडी क्षेत्रात संपूर्ण महाराष्ट्रासह , गोवा , आंध्रप्रदेश , गुजरात,कर्नाटक मधील दत्त भक्त येत असतात.
शनिवार दि . 14 डिसेंबर रोजी सायंकाळी ठीक 5.00 वाजता श्रींचे मुख्य मंदिरात श्री दत्त जन्मकाळ सोहळा संपन्न झाला . त्यानिमित्य श्री दत्त मंदिरात कार्यक्रमातील संपूर्ण दिवसभर कार्यक्रम झाले त्यात पहाटे 4 वाजता काकड आरती व शोडषोपचार पूजा, सकाळी 7 ते 12 यावेळेत पंचामृत अभिषेक, दुपारी 12.30 वाजता श्रींचे चरणकमलावर महापूजा व भाविकांसाठी महाप्रसाद, दुपारी 3 वाजता येथील ब्रह्मवृंदांकडून पवमान पंचसुक्तांचे पठण होईल.दुपारी 4 नंतर श्री नारायणस्वामी महाराजांचे मंदिरातील श्रींची उत्सवमूर्ती सवाद्य मुख्य मंदिरात आणण्यात येईल त्यानंतर 4.30 वाजता ह, भ.प. भालचंद्र देव (रा. केज आंबेजोगाई) यांचे सुश्राव्य कीर्तन होऊन सायंकाळी ठीक 5 वाजता दत्त जन्मकाळ सोहळा संपन्न होणार आहे. जन्मकाळानंतर पारंपारिक आरती, पाळणा होऊन सुंठवडा प्रसाद वाटणेत येणार आहे. रात्री 9 नंतर धूप दीप आरती व पालखी सोहळा होवून रात्री उशिरा शेजारती होणार आहे. श्रींचा पाळणा जन्मकाळानंतर उत्सवाचे मानकरी बाळकृष्ण राजोपाध्ये यांचे सुयोग हॉल येथे ठेवण्यात आले. सर्व भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला.
जादा एसटी बसेससह, पोलिसांचा चोख बंदोबस्त भाविकांना दत्त दर्शन सुलभ व्हावे यासाठी दर्शनरांग व्यवस्था, मुखदर्शन, क्लोज सर्किट टीव्ही व्यवस्था, ध्वनीक्षेपक यंत्रणा, सकाळी 10 ते रात्री 10 पर्यंत मोफत महाप्रसाद, कापडी मंडप, शामियाना, आकर्षक विद्युत रोषणाई, आदी आवश्यक सोयी व सुविधा दत्त देव संस्थान मार्फत करण्यात आली. आवश्यक नियोजन,अतिशय चांगल्या नेटक्या नियोजनासह दर्शन रांगा बनवून संपूर्ण व्यवस्था करण्यात आली होती या साठी देववस्थान व्यवस्थापन , संपूर्ण कर्मचारी , ग्रामपंचायत , रेस्क्यू फोर्स , पोलीस प्रशासन व सहकार भूषण एस. के.पाटील कॉलेजचे स्वयंसेवक याचे खुप मोठे सहकार्य लाभले .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा